लाइव्ह चोरीचा क्यूट व्हिडीओ

By Admin | Updated: June 23, 2017 00:11 IST2017-06-23T00:11:36+5:302017-06-23T00:11:36+5:30

७७,११३,३३७ व्ह्यूज, १५२३५४ शेअर, १०४ हजार लाइक्स... हे आकडे आहेत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओला मिळालेल्या रिस्पॉन्सचे.

Live Stolen Cute Video | लाइव्ह चोरीचा क्यूट व्हिडीओ

लाइव्ह चोरीचा क्यूट व्हिडीओ

वॉशिंग्टन : ७७,११३,३३७ व्ह्यूज, १५२३५४ शेअर, १०४ हजार लाइक्स... हे आकडे आहेत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओला मिळालेल्या रिस्पॉन्सचे. अपलोड केल्यानंतर अवघ्या तासाभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत एक बालक आहे, श्वान आहे, अन्न आहे आणि चोरीही आहे. फेसबुकवर रॉब हर्बर्ट नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. व्हिडीओत दिसणारा गोड चिमुकला त्यांचा मुलगा आहे. हा छोटू सगळ्यांच्या नजरा चुकवून निर्धास्तपणे चोरी करताना व्हिडीओत दिसतो. या चौर्यकर्मात त्याला साथ देत आहे त्याचा श्वान. फ्रीज खूप उंच आहे; पण चिमुकला अजिबात डगमगत नाही. फ्रीज फोडण्याची (चोरी) त्याने आधीच यच्चयावत योजना आखली होती, असे वाटते. आधी तो श्वानाच्या पाठीवर चढला. नंतर संपूर्ण शक्ती एकवटून त्याने फ्रीजचे एक दार उघडले. अशाच प्रकारे दुसरे दारही उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शक्ती कमी पडली. दरवाजा काही उघडू शकला नाही. मग तो श्वानावरून खाली उतरला. काही क्षणांनी तो पुन्हा श्वानावर चढला. फ्रीजमधून आवडती वस्तू काढणार एवढ्यात गडबड झाली. त्याला जिवाभावाच्या सवंगड्याने धोका दिला. श्वानाने अचानक धूम ठोकली. कोणताही आधार नसल्यामुळे छोटा चोर फ्रीजला लटकला. आपली ही क्यूट चोरी तिसऱ्या डोळ्यात कैद होत आहे याची त्याला कल्पना नव्हती.

Web Title: Live Stolen Cute Video