वॉश्गिंटन - जगातील ताकदवान देशांमध्ये सध्या वाढणाऱ्या तणावात सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या देशांची रॅकिंग जारी झाली आहे. ग्लोबल फायरपॉवरने यावर्षी १४५ देशांच्या सैन्याची क्षमता, साहित्य आणि उपकरणाआधारे रॅकिंग केली आहे. या रॅकिंगमध्ये पारंपारिक संरक्षण ताकदांसाठी ६० मानके, सैनिकांची संख्या, आर्थिक स्थिती आणि इतर गोष्टींवर सैन्यांची तुलना करण्यात आली आहे. यासोबतच देशांची आण्विक क्षमताही लक्षात ठेवली आहे. या रँकिंगमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याचाही समावेश आहे.
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सनुसार, २०२५ मध्ये अमेरिकन सैन्याला जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून नोंदवण्यात आले आहे. अमेरिकेचा पॉवरइंडेक्स स्कोअर ०.०७४४ इतका आहे. जो रॅकिंगमध्ये सहभागी सर्व देशांच्या शून्यच्या सर्वात जवळ आहे. जो देश 0 च्या जितके जवळ असेल तितकी त्याची रॅकिंग चांगली मानली जाते. अमेरिकेचे संरक्षण बजेट जगात पहिल्या स्थानी आहे. २०२४ साली ८७३ अब्ज डॉलरहून अधिक संरक्षण बजेट होते. या रॅकिंगमध्ये रशियाला ०.०७८८ इंडेक्ससह दुसरा सर्वात शक्तिशाली सैन्य असलेला देश निवडले आहे. पारंपारिक शक्तिसोबतच रशियाजवळ महाकाय आण्विक शस्त्रे आहेत. विमान, हेलिकॉप्टर आणि टँकसारख्या कारणाने हा देश दुसऱ्या स्थानी आहे. या ग्लोबल रॅकिंगमध्ये भारताचा शेजारील देश चीन तिसऱ्या स्थानावर आहे. चीनचं फायरपॉवर इंडेक्स ०.०७८८ इतके आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा भारत सर्वात शक्तिशाली सैन्याच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ०.११८४ इंडेक्ससह भारत चीनपासून केवळ एक पाऊल मागे आहे. परंतु सैन्याचं वयोमानानुसार लोकसंख्येमुळे भारत पहिल्या स्थानावर आहे. एकूण लोकसंख्येनुसार जनशक्ती, श्रमशक्ती आणि सक्रीय अर्धसैनिक दल या क्षेत्रात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. ग्लोबल इंडेक्सनुसार दक्षिण कोरिया पाचवा सर्वात शक्तिशाली सैन्य असणारा देश आहे. ब्रिटन ०.१७८५ इंडेक्ससह जगातील सहाव्या शक्तिशाली सैन्य असलेला देश ठरला आहे. या यादीत सातव्या क्रमांकावर फ्रान्स आहे. आठव्या नंबरवर जपानचा समावेश आहे. पाकिस्तानचा मित्र तुर्की टॉप १० मध्ये समाविष्ट आहे. या यादीत नवव्या नंबरवर तुर्की आणि दहाव्यावर इटलीचा समावेश आहे.
पाकिस्तानी सैन्याचा कितवा नंबर?
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलाकडून सपाटून मार खाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा टॉप १० मध्ये समावेश नाही. पाकिस्तान जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा इंडेक्स ०.२५१३ इतका आहे, जो भारताच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. पाकिस्तानने लढाऊ विमाने, टँक, तोफखाने आणि मल्टीरेंजर मिसाइलसाठी ओळखला जातो.
Web Summary : US tops Global Firepower's 2025 ranking of world's strongest militaries. Russia is second, followed by China. India secures fourth position, ahead of South Korea and others. Pakistan ranks twelfth.
Web Summary : ग्लोबल फायरपावर की 2025 की रैंकिंग में अमेरिका विश्व की सबसे शक्तिशाली सेनाओं में शीर्ष पर है। रूस दूसरे और चीन तीसरे स्थान पर है। भारत ने दक्षिण कोरिया और अन्य देशों से आगे चौथा स्थान हासिल किया। पाकिस्तान बारहवें स्थान पर है।