अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सिंहांनी केली 'तिची' सुटका
By Admin | Updated: October 28, 2016 13:01 IST2016-10-28T12:54:06+5:302016-10-28T13:01:30+5:30
सात जणांनी या मुलीला तिच्या घरातून पळवून आणले होते. पळवून आणल्यापासून अपहरणकर्त्यांकडून या मुलीला मारहाण सुरु होती.

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सिंहांनी केली 'तिची' सुटका
ऑनलाइन लोकमत
अगारो, दि. २८ - इथोपियाच्या जंगलात तीन सिंहांनी मिळून एका १२ वर्षाच्या मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. सात जणांनी या मुलीला तिच्या घरातून पळवून आणले होते. पळवून आणल्यापासून अपहरणकर्त्यांकडून या मुलीला मारहाण सुरु होती.
अपहरणकर्त्यांपैकी एक जण या मुलीवर लग्नासाठी जबरदस्ती करत होता. एकेदिवशी अपहरणकर्त्यांनी इथोपियाच्या जंगलात नेऊन मुलीला मारहाण सुरु केली. ही मुलगी मदतीसाठी किंचाळत होती. त्याचवेळी अचानक झुडूपातून तीन सिंह समोर उभे ठाकले. त्यांनी थेट अपहरणकर्त्यांची पाठ काढली.
अपहरणकर्त्यांना तिथून पिटाळून लावल्यानंतर या सिंहांनी मुलीला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली नाही. उलट जंगल अधिकारी तिथे पोहोचेपर्यंत सिंह तिथेच थांबले. जंगल अधिका-यांनी या मुलीला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर सिंह तिथून निघून गेले असे वृत्त न्यूज फॉक्सेसने दिले आहे.