लिओनेल मेस्सीने घेतली निवृत्ती मागे, पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळणार

By Admin | Updated: August 13, 2016 02:34 IST2016-08-13T01:18:26+5:302016-08-13T02:34:06+5:30

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्ती मागे घेण्याचे जाहीर केले असून त्याने यांसदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता तो पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळताना दिसणार आहे.

Lionel Messi retires from retirement, will play again from Argentina | लिओनेल मेस्सीने घेतली निवृत्ती मागे, पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळणार

लिओनेल मेस्सीने घेतली निवृत्ती मागे, पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळणार

ऑनलाइन लोकमत
ब्यूनस आयर्स, दि. १३ - फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्ती मागे घेण्याचे जाहीर केले असून त्याने यांसदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता तो पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळताना दिसणार आहे.
लिओनेल मेस्सीने एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये अर्जेंटिना फुटबॉलमध्ये अनेक समस्या आहेत. त्यात मला आणखी करण्याची इच्छा नाही. निवृत्ती घेण्याचा निर्णय मी गंभीरपणे घेतला होता. परंतु माझे या देशावर आणि जर्सीवर खूप प्रेम आहे, असे म्हटले आहे. 
जून 2016 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर मेस्सीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी निवृत्ती मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. 

 

Web Title: Lionel Messi retires from retirement, will play again from Argentina