ब्रिटनचे आकाश उजळले उल्कावर्षावाने
By Admin | Updated: August 13, 2015 22:32 IST2015-08-13T22:32:33+5:302015-08-13T22:32:33+5:30
बुधवारची रात्र खगोलप्रेमींनी याचि देही याचि डोळा आकाशी चाललेला उल्कावर्षावाचा नयनरम्य सोहळा पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. दरवर्षी होणाऱ्या

ब्रिटनचे आकाश उजळले उल्कावर्षावाने
लंडन : बुधवारची रात्र खगोलप्रेमींनी याचि देही याचि डोळा आकाशी चाललेला उल्कावर्षावाचा नयनरम्य सोहळा पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. दरवर्षी होणाऱ्या या खगोलीय खेळाचे साक्षीदार होण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून हौशी, तसेच खगोलप्रेमी मोठ्या संख्येने अगदी जय्यत तयारीने येतात. यंदाच्या उल्कावर्षावाचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्रकलेची रुजुवात आणि उल्कावर्षाव असा योग २००७ नंतर पहिल्यांदाच आला. अमावास्येची रात्र आणि आकाशी चाललेला उल्कावर्षाव (पर्सिड- हा एक तारकापुंज आहे) पाहण्याचे सर्वात योग्य ठिकाण म्हणजे उत्तर इंग्लंड.
दक्षिण इंग्लंड आणि स्कॉटलँडमधील काही भागातील ढगाळी वातावरणामुळे मात्र हा नजराणा पाहण्याच्या येथील लोकांच्या इच्छेवर पाणी फेरले जाऊ शकते. लुईस स्विफ्ट आणि हॉरेस टटल या खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या स्वीफ्ट-टटल धूमकेतूच्या धुळीकरणांतून तयार झालेला तारकापुंज म्हणजे पर्सिड. दरवर्षी १७ जुलै ते २४ आॅगस्ट दरम्यान हा तारकापुंज सक्रिय होत असतो. तथापि, यापैकी काही मोजकेच उल्कापिंड काही वेळेसाठी पाहता येऊ शकतात. (वृत्तसंस्था)