शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:14 IST

'मंगळावर सापडलेल्या यो गोष्टी म्हणजे तेथे जीवसृष्टी होती हे सांगणारा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे

न्यू यॉर्क- पृथ्वीबाहेर एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा विचार आपण सतत करत असतो. चंद्रावरही जीवसृष्टी होती का, तेथे माणसाला भविष्यात राहाता येणे शक्य आहे का असे प्रश्नही आपल्याला पडत असतात. पृथ्वीबाहेरील जीवनावर अनेक कथा, चित्रपटही निघाले आहेत. मात्र आता हे केवळ कल्पनेपुरते राहिले नसून कदाचित मंगळावरील जीवसृष्टीचा इतिहास शोधण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.

नासाच्या मार्स रोव्हर क्युरुओसिटी यानाला मंगळावरती काही जैविक अणू सापडले असून कार्बनचा अंश असलेले बिल्डिंग ब्लॉक्सही (वीट सदृश्य ठोकळे) सापडले आहेत. त्यामुळे तेथे एकेकाळी जीवसृष्टी असावी असा अंदाज बांधला जात आहे. मंगळाचे वय 3.5 अब्ज वर्षे आहे, त्याची संपूर्ण माहिती व संशोधन करण्यासाठी नासाने मार्स सोव्हर क्युरिओसिटी हे यान मंगळावर पाठवले आहे.रोव्हरने दिलेल्या माहितीवर शोधनिबंध तयार करणाऱ्या जेनिफर एजिब्रोड यांनी याबाबत सांगितले,''मंगळावर सापडलेल्या यो गोष्टी म्हणजे तेथे जीवसृष्टी होती हे सांगणारा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे त्याची ठोस माहिती नाही इतकेच. '' नासाच्या ग्रीनबेल्ट, मेरीलँड येथील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथे ते बोलत होते. जरी तेथे सजीव नव्हते असं पुढे अभ्यासातून लक्षात आलं तरी तेथे सजीवांना खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध होतं इतका निष्कर्ष आपल्याला काढता येईल असे त्या म्हणाल्या. भूगर्भीय हालचालींमुळे मिथेन निर्माण होऊ शकतो मात्र तेथे सापडलेले पदार्थ हे मंगळावर कायमच राहिले आहेत आणि आपल्यासाठी तीच मोठ्या उत्साहाची बाब आहे अशी जेनिफर यांनी या शोधाचे महत्त्व सांगताना माहिती दिली.रोव्हरला सापडलेल्या गोष्टी या जैविकदृष्ट्या तयार झाल्या होत्या अशी शक्यता आपण नाकारु शकत नाही. त्या जैविक होत्याच असंही आता म्हणता येणार नाही, पण ती शक्यता संशोधनप्रक्रियेतून वगळलेली नाही असं नासाच्या कॅलिफोर्निय़ा येथिल जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)मधील वरिष्ठ संशोधक ख्रिस वेबस्टर यांनी सांगितले.

टॅग्स :Marsमंगळ ग्रहInternationalआंतरराष्ट्रीयNASAनासा