लिबियानजीक प्रवासी बोट बुडाली
By Admin | Updated: August 31, 2014 23:26 IST2014-08-31T23:26:00+5:302014-08-31T23:26:00+5:30
शंभर प्रवासी असलेली एक बोट राजधानी त्रिपोलीनजीक बुडाली असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अद्याप कळला नाही

लिबियानजीक प्रवासी बोट बुडाली
त्रिपोली : शंभर प्रवासी असलेली एक बोट राजधानी त्रिपोलीनजीक बुडाली असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अद्याप कळला नाही, असे लिबियाच्या तटवर्ती सुरक्षा दलाचे अधिकारी अब्देल लतीफ मोहम्मद यांनी सांगितले. त्रिपोलीपासून ५० किलोमीटर दूर पूर्वेला अलकर बाऊली किनाऱ्यावर ही दुर्घटना घडली. मागच्या आठवड्यात आफ्रिकेचे १०० प्रवासी याच ठिकाणी बुडाले होते.