माजी उपपंतप्रधानांचे लिबियात अपहरण

By Admin | Updated: July 31, 2014 03:48 IST2014-07-31T03:48:30+5:302014-07-31T03:48:30+5:30

अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लिबियाचे माजी उपपंतप्रधान मुस्तफा अबू शागोर यांचे मंगळवारी अपहरण के

Libyan kidnapping of former Deputy Prime Minister | माजी उपपंतप्रधानांचे लिबियात अपहरण

माजी उपपंतप्रधानांचे लिबियात अपहरण

त्रिपोली : अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लिबियाचे माजी उपपंतप्रधान मुस्तफा अबू शागोर यांचे मंगळवारी अपहरण केले, अशी माहिती एका संसद सदस्याने दिली. बंदूकधाऱ्यांनी अबू शागोर यांना त्यांच्या घराजवळच धाक दाखवत एका कारमध्ये बसविले आणि त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेले, अशी माहिती संसद सदस्य इसाम-अल-नासी यांनी शिन्हुआला दिली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. बंदूकधारी येण्याच्या काही क्षण आधी शागोर यांना एक दूरध्वनी आला होता.

 

Web Title: Libyan kidnapping of former Deputy Prime Minister