व्हाईट हाऊसला ‘साईनाईड’युक्त पत्र
By Admin | Updated: March 18, 2015 23:52 IST2015-03-18T23:52:51+5:302015-03-18T23:52:51+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसला ‘सायनाईड’युक्त पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

व्हाईट हाऊसला ‘साईनाईड’युक्त पत्र
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसला ‘सायनाईड’युक्त पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रावरही राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी मल-मूत्राने भरलेले पॅकेट पाठविलेल्या व्यक्तीचे नाव होते. अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ता ब्रायन लियरी यांनी सांगितले की, १६ मार्च रोजी व्हाईट हाऊसच्या मेल स्क्रीनिंग केंद्रास एक लिफाफा मिळाला.
याचा प्राथमिक तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे. तथापि, १७ मार्च रोजी झालेल्या रासायनिक चाचणीत सायनाईड असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.’