अत्याचारप्रकरणी विद्वानांचे मोदींना पत्र
By Admin | Updated: October 18, 2015 22:11 IST2015-10-18T22:11:10+5:302015-10-18T22:11:10+5:30
भारतात महिलांबाबत होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील अनेक आघाडीच्या महिला संघटनांनी व महिला विद्वानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

अत्याचारप्रकरणी विद्वानांचे मोदींना पत्र
लंडन : भारतात महिलांबाबत होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील अनेक आघाडीच्या महिला संघटनांनी व महिला विद्वानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मोदी यांनी पाळलेल्या मौनाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. मोदी हे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार आहेत. पत्रावर अपना हकचे संचालक झ्लाखा अहमद, आशा प्रोजेक्टच्या संचालक इला पटेल, आशियान नेटवर्कचे संचालक शमिंदर उभी, आशियन वुमेन्स रिसर्च सेंटरचे संचालक सरबजित गांगर, ब्लॅक असोसिएशन आॅफ वुमेन स्टेप आऊटचे संचालक वेनया चिंबा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.