शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:43 IST

Lebanon shaken by Israeli attacks : या भीषण हल्ल्यांत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८९० हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते. अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत...

इस्रायल आणि ईरानमध्ये सीजफायर झाल्यानंतर, इस्रायलने बुधवारी रात्री लेबनानमध्ये आतापर्यंतचा सर्वात भीषण हवाई हल्ला केला. अवघ्या १० मिनिटांत इस्रायलने १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. हे हल्ले हिज्बुल्लाहचे कमांड सेंटर आणि लष्करी तळांवर करण्यात आले, असा दावा इस्रायलने केला आहे. या भीषण हल्ल्यांत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८९० हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते.

अनेक जण ढिगाऱ्याखाली -यासंदर्भात, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत किमान २५४ लोक मारले गेले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो. ८९० जण जखमी झाले आहेत. बेरूत, दक्षिण लेबनान आणि बेका घाटीमध्ये झालेल्या या हल्ल्यांनंतर बचावकार्य अद्यापही सुरूच आहे. युद्धाच्या या धगधगत्या आगीत आतापर्यंत १७०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला असून, यात १३० मुलांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, इस्रायलने हिज्बुल्लाहचे ११०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

इराणचा इशारा -युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही, इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले सुरूच ठेवले आहेत. याच्या निषेधार्थ, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली, जी युद्धविराम करारानंतर खुली करण्यात आली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यासंदर्भात इशाराही दिला आहे. ते म्हणाले, जर लेबनॉनवरील हल्ले थांबवले गेले नाहीत, तर इराण शस्त्रसंधी करार रद्द करेल. त्यांनी 'एक्स' (X) वर लिहिले, "इराण-अमेरिका युद्धविरामाच्या अटी स्पष्ट आहेत आणि अमेरिकेने हे ठरवले पाहिजे की, ते खरोखरच युद्धविरामाची अंमलबजावणी करणार की इस्रायलमार्फत युद्ध सुरूच ठेवणार. कारण या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाही."

एवढेच नाही तर, "संपूर्ण जग लेबनॉनमधील हिंसाचार बघत आहे. आता निर्णय अमेरिकेच्या हातात आहे. अमेरिका आपले आश्वासन कितपत पाळतो हे संपूर्ण जग पाहत आहे," असेही अब्बास यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Strikes Lebanon: Hundreds Dead, Iran Warns Ceasefire at Risk

Web Summary : Israeli strikes in Lebanon killed hundreds, injuring many more. Iran warned that continued attacks could nullify the ceasefire agreement, urging the US to enforce peace.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणDeathमृत्यूBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू