शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 21:38 IST

Lebanon Walkie-Talkie Blast, Hezbollah: सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या ताज्या बॉम्बस्फोटात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Lebanon Walkie-Talkie Blast, Hezbollah: पेजर स्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी लेबनानची राजधानी बेरूतमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट झाले आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार हे स्फोट वॉकीटॉकी (Walkie Talkie Blast) आणि काही जुन्या रेडिओ-लॅपटॉप व मोबाईलच्या माध्यमातून झाले. स्फोट झालेले पेजर (pager blast) हे हिजबुल्लाहचे सैनिक वापरत होते. आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या ताज्या बॉम्बस्फोटात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था एएफपीनुसार, लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, वॉकी-टॉकीजमधील ताज्या स्फोटांमध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज एजन्सी (NNA) ने म्हटले आहे की, दक्षिणेकडील बेका खोऱ्यातील सोहमर शहरात 'डिव्हाइस'मध्ये झालेल्या स्फोटांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण लेबनॉनमधील बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील घरांमध्ये 'जुन्या पेजर्स'मध्ये स्फोट झाल्याचे वृत्त एनएनएने दिले आहे. अनेक जखमींना राजधानी बेरूत आणि बालबेक येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

एनएनएच्या वार्ताहराने सांगितले की मध्य बेका येथील अली अल-नहारी गावात रस्त्याच्या कडेला एका डिव्हाईसचा स्फोट झाला. त्यात दोन लोक जखमी झाले. दुसऱ्या वार्ताहराने सांगितले की दक्षिणी बेका येथील झैदेत मर्जेयॉनच्या स्मशानभूमीजवळ एका कारमध्ये पेजरचा स्फोट झाला. दक्षिण लेबनानच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावर असलेल्या सिडॉनमधील एका फोनच्या दुकानातून धूर निघत असल्याची चित्रे समोर आली. धुराचे लोट वाढण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी लेबनानमध्ये गेल्या तासाभरात नव्याने काही डिव्हाईसमध्ये स्फोट झाले आहेत.

टॅग्स :Blastस्फोटMobileमोबाइलlaptopलॅपटॉप