शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या पंतप्रधानाला परत द्या, लेबनॉनची सौदी अरेबियाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:45 IST

सौदी अरेबियामध्ये असलेल्या आमच्या पंतप्रधानांना परत पाठवा अशी मागणी लेबनॉनने केली असून सौदीने आपल्या पंतप्रधानांना ताब्यात घेऊन सौदी अरेबियामध्येच ठेवल्याचा आरोप लेबनॉनने केला आहे.

ठळक मुद्दे "हिजबोल्ला जोपर्यंत लेबनॉन सरकारमध्ये आहे तोवर लेबनॉनला सौदी अरेबिया विरोधी देशच मानेल. हिजबोल्लाचा सरकारमध्ये समावेश म्हणजे सौदी अरेबियाविरोधात युद्ध पुकारल्यासारखेच आहे" असे मत सौदीचे आदेल अल-जुबेर यांनी व्यक्त केले आहे.

बैरुत- सौदी अरेबियामध्ये असलेल्या आमच्या पंतप्रधानांना परत पाठवा अशी मागणी लेबनॉनने केली असून सौदीने आपल्या पंतप्रधानांना ताब्यात घेऊन सौदी अरेबियामध्येच ठेवल्याचा आरोप लेबनॉनने केला आहे. गेल्या आठवडाभरात सौदी अरेबिया आणि लेबऩनमधील तणाव वाढीस लागला आहे. मध्यपुर्वेतील वातावरण नव्याने चिघळण्याची शक्यता आहे. लेबनॉनचे पंतप्रधान साद अल हारिरी यांनी सहा दिवसांपुर्वी सौदी अरेबियातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. "हिजबोल्लाच्या मार्फत इराण आपली लेबनॉनमधील शक्ती वाढवत असून सरकारचा ताबा हिजबोल्लाने घेतला घेतला आहे, आपल्याला ठार मारण्यासाठी कट आखला जात असल्याची जाणीव मला झाली " असे हारिरी यांनी स्पष्ट केले आहे. काही राजकीय नेत्यांच्या मतानुसार सौदीने हारिरी यांना नजरकैदेत ठेवले असून त्यांना राजीनामा देण्याचे आदेशही सौदी अरेबियानेच दिले होते.सौदी नागरिकांनो लेबनॉनमध्ये राहू नका- सौदी अरेबियाचे आदेशसौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश दिले आहेत. लेबनॉनमधील हिजबोल्ला संघटनेला इराणचे पाठबळ मिळत असल्याचा सौदी अरेबियाचा आरोप आहे. इराण सर्व प्रदेशात आपले बळ वाढवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने पाठबळ दिल्यावर सौदीने ही भूमिका घेतली आहे.सौदीने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश दिल्यानंतर बाहरिन आणि कुवेतनेही आपल्या नागरिकांना माघारी येण्याच्या सूचना केल्या आहेत. "हिजबोल्ला जोपर्यंत लेबनॉन सरकारमध्ये आहे तोवर लेबनॉनला सौदी अरेबिया विरोधी देशच मानेल. हिजबोल्लाचा सरकारमध्ये समावेश म्हणजे सौदी अरेबियाविरोधात युद्ध पुकारल्यासारखेच आहे" असे मत सौदीचे आदेल अल-जुबेर यांनी व्यक्त केले आहे. 2006 सालच्या युद्धबंदी करारानुसार लेबनॉनने सीमेपासून हिजबोल्लाला दूर ठेवावे आणि हिजबोल्ला संघटना पूर्णपणे शक्तीहीन करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत इस्रायलचे गुप्तचर वार्ता मंत्री यिझराएल काट्झ यांनी व्यक्त केले आहे.