शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानला झटका : अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेनं अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र, वाहनं जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 22:03 IST

Afghanistan Taliban Crisis : ईगल नावाचा सीआयएचा कँप काबुलच्या देह सब या ठिकाणी स्थित आहे. एनडीएस ०१ फोर्से या ठिकाणी करण्यात आली होती तैनात.

ठळक मुद्देईगल नावाचा सीआयएचा कँप काबुलच्या देह सब या ठिकाणी स्थित आहे.एनडीएस ०१ फोर्से या ठिकाणी करण्यात आली होती तैनात.

अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकनांनी कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रे आणि वाहने नष्ट केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. अफगाणिस्तानातील स्थानिक माध्यमांनी तालिबानच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सोमवारी तालिबाननं पत्रकारांना माजी सीआयए ऑपरेशनल सेंटरमध्ये प्रवेश दिला. अमेरिकन सैनिकांनी येथून बाहेर पडण्यापूर्वी सर्व लष्करी उपकरणं, वाहनं आणि कागदपत्रं जाळून टाकल्याचं तालिबाननं यावेळी त्यांना सांगितलं. टोलो न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.'ईगल' नावाचे हे सीआयए कॅम्प काबूलच्या देह सब परिसरात आहे. अमेरिकन गुप्तचर अधिकारी आणि अफगाणचे NDS 01 फोर्सेस येथे तैनात होते. आता हा परिसर तालिबानच्या ताब्यात आहे. महत्त्वाची कागदपत्रे, शेकडो हम्वीज, लष्करी टॅक्स आणि शस्त्रं अमेरिकन सैन्यानं नष्ट केली असल्याचं टोलो न्यूजनं तालिबानच्या हवाल्यानं म्हटलं आहे. या ठिकाणी ज्याचा वापर करता येऊ शकला असता ते सर्वकाही नष्ट करण्यात आल्याची प्रतिक्रिया कँपचा कमांडर मौलवी अथनेन यानं दिली.माईन्सच्या भीतीनं तालिबान खोल्यांपासून दूरसध्याही तालिबाननं कॅम्पमधील अनेक खोल्यांमध्ये प्रवेश केलेला नाही. या ठिकाणी माईन्स असतील अशी भीती सध्या त्यांच्यात आहे. ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकनं लष्करानं अफगाणिस्तान सोडलं. २० वर्षांपर्यंत सुरू असलेल्या मोठ्या युद्धानंतरही अमेरिकेचं लष्कर या ठिकाणाहून गेल्यानंतर अफगाणिस्तानची परिस्थिती हालाकीची झाली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून ६ हजार अमेरिकन नागरिकांना बाहेर काढलं असल्याची माहिती अमेरिकेचे सुरक्षा सचिन लॉयड जे ऑस्टीन-३ यांनी दिली. तसंच आतापर्यंत बाहेर काढलेल्या एकूण नागरिकांची संख्या १,२४,००० असल्याचंही ते म्हणाले.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानMediaमाध्यमे