देश सोडून जा, तालिबानची परदेशी नागरिकांना धमकी
By Admin | Updated: June 16, 2014 23:53 IST2014-06-16T23:53:14+5:302014-06-16T23:53:14+5:30
पाकिस्तानात युद्धस्थिती असल्याने देश सोडून जा अन्यथा हिंसाचाराला सामोरे जावे लागेल, असा इशारा तालिबानने देशातील सर्व आंतरराष्ट्रीय संघटना आणि परदेशी नागरिकांना दिला आहे.

देश सोडून जा, तालिबानची परदेशी नागरिकांना धमकी
इस्लामाबाद : पाकिस्तानात युद्धस्थिती असल्याने देश सोडून जा अन्यथा हिंसाचाराला सामोरे जावे लागेल, असा इशारा तालिबानने देशातील सर्व आंतरराष्ट्रीय संघटना आणि परदेशी नागरिकांना दिला आहे.
नागरिकांची शांततेची इच्छा गाडून टाकत पाकने आपल्या पाश्चात्त्य पाठीराख्यांना खुश करण्यासाठी उत्तर वजिरिस्तान भागात लष्करी कारवाई सुरू केली आहे, असे तालिबानचा प्रवक्ता शाहिदुल्ला शाहिद याने सांगितले. आम्ही युद्धाच्या स्थितीत असल्याने सर्व आंतरराष्ट्रीय संघटना, विमान कंपन्या व गुंतवणूकदारांनी पाकसोबतचे व्यावसायिक संबंध तात्काळ संपुष्टात आणत देशाबाहेर पडावे. अन्यथा त्यांना होणाऱ्या इजेला ते स्वत:च जबाबदार राहतील, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)