शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

Uganda Bomb Blasts : युगांडा हादरला; दोघांनी स्वतःला बॉम्बनं उडवलं, पोलिसांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या, अनेक जण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 14:40 IST

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हल्ल्यानंतर लोक शहर सोडताना दिसत आहेत.

युगांडाची राजधानी कंपालामध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण स्फोटांत किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला सरकारविरोधी अतिरेक्यांचा समन्वित हल्ला म्हटले आहे. तसेच, या स्फोटांत तीन आत्मघाती हल्लेखोरही मारले गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटामुळे कंपालामध्ये प्रचंट घबराटीचे वातावरण आहे. पोलीस प्रवक्ते फ्रेड एनान्गा म्हणाले, "बॉम्ब हल्ला, विशेषत: आत्मघातकी हल्लेखोरांकडून अजूनही हल्ल्याचा धोका काय आहे." (Suicide Bombings in Uganda)

अतिरेकी गटांच्या अथवा कट्टरतावाद्यांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या साइटनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित असलेल्या अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेसने स्फोटांची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही स्फोट केवळ तीन मिनिटांच्या आतच झाले आहेत. हे दोन्ही स्फोट स्फोटक घेऊन जाणाऱ्या हल्लेखोरांनी घडवून आणले. एनान्गा यांनी सांगितले, की तिसऱ्या लक्षावरील संभाव्य हल्ले पोलिसांनी अयशस्वी केले. यावेळी पोलिसांनी एका संशयित आत्मघातकी हल्लेखोराचा पाठलाग केला आणि त्याला ठार केले. मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

किमान 33 लोक जखमी -एनान्गा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रेफरल हॉस्पिटलमध्ये किमान 33 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हल्ल्यानंतर लोक शहर सोडताना दिसत आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना, यूएस दूतावासाने “कठोर शब्दांत” हल्ल्याचा निषेध केला आहे. एवढेच नाही, अमेरिकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "युगांडातील लोकांसाठी अमेरिकेचे समर्थन कायमच आहे. कारण आम्ही सुरक्षित, लोकशाही आणि समृद्ध युगांडाच्या आमच्या सामायिक ध्येयासाठी कार्यरत आहोत." यापूर्वीही, कंपालाच्या एका भागात 23 ऑक्टोबरला एका रेस्टॉरंटमध्ये  स्फोट झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर सात जण जखमी झाले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद