इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार, 832 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 12:54 PM2018-09-30T12:54:01+5:302018-09-30T13:06:23+5:30

भुकंपामुळे पालू आणि डोंग्गाला या दोन शहरांचे सर्वात अधिक नुकसान झाले आहे. 

At least 832 dead in Indonesia quake-tsunami disaster: official (AFP) | इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार, 832 जणांचा मृत्यू

इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार, 832 जणांचा मृत्यू

googlenewsNext

जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) 7.5 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने त्सुनामीचाही जोरदार फटका बसला आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स खात्याने याबाबत माहिती दिली होती. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 832 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुकंपामुळे पालू आणि डोंग्गाला या दोन शहरांचे सर्वात अधिक नुकसान झाले आहे. एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.



जिओफिजिक्स खात्याचे प्रवक्त्याने त्सुनामी आल्याचे सांगितले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मात्र, याबाबत माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.




इंडोनेशियाच्या एका वृत्त वाहिनीने याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून यामध्ये अजस्त्र लाट उसळल्याचे दिसत आहे. आणि तेथील लोक आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत. 


 

Web Title: At least 832 dead in Indonesia quake-tsunami disaster: official (AFP)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.