शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानातील काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट; 20 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 08:19 IST

बॉम्बस्फोटात 50 हून अधिक नागरिक जखमी

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दोन मोठे बॉम्बस्फोट झाले आहेत. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काबूल शहरातील क्रीडा संकुलात बुधवारी संध्याकाळी हे स्फोट झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. काबूलमध्ये बुधवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाले. यातील पहिला स्फोट कला-ए-नजरिया परिसरातील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाला. एका आत्मघाती हल्लेखोरानं हा स्फोट घडवला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. तर 30 जण जखमी झाले. यानंतर लगेचच दुसरा बॉम्बस्फोट झाला. यात 6 जण मृत्यूमुखी पडले. देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'मी काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. या हल्ल्यात अनेक अॅथलिट्स, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही दहशतवादाविरोधात देश म्हणून एकत्र आहोत, याची आमच्या शुभचिंतकांना कल्पना आहे', असं करझाई यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रीडा संकुलातील खेळाडू आणि पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात किती णांचा झाला आणि किती जण जखमी झाले, याची अधिकृत माहिती अद्याप अफगाणिस्तान सरकारनं दिलेली नाही. स्थानिक वृत्तवाहिनी टोलो न्यूजच्या दोन पत्रकारांनी या हल्ल्यात प्राण गमावला आहे. पहिला बॉम्बस्फोट होताच टोलो न्यूजचे दोन पत्रकार घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी पोहोचले. मात्र तितक्यात दुसरा स्फोट झाला आणि त्यामध्ये दोन्ही पत्रकारांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Blastस्फोटAfghanistanअफगाणिस्तान