लिएंड्रा बेसेरा सर्वात वयोवृद्ध
By Admin | Updated: August 31, 2014 23:31 IST2014-08-31T23:31:16+5:302014-08-31T23:31:16+5:30
१२७ वा वाढदिवस साजरी करणारी मेक्सिकोतील लिएंड्रा बेसेरा ल्युमब्रेरास जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती असू शकते.

लिएंड्रा बेसेरा सर्वात वयोवृद्ध
लंडन : १२७ वा वाढदिवस साजरी करणारी मेक्सिकोतील लिएंड्रा बेसेरा ल्युमब्रेरास जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती असू शकते. ३१ आॅगस्ट १८८७ रोजी लिएंड्राचा जन्म झाला. दोन्ही विश्वयुद्धाची ती साक्षीदार आहे. चॉकलेट खाणे आणि भरपूर झोप घेणे, हे तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. मिरर डॉट सीओ डॉट युकेच्या वृत्तानुसार १९१०-१९१७ मधील मेक्सिकन क्रांतीत ती ‘अॅडेलिटास’ची नेता म्हणून लढली होती.