शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ब्रिटनने अब्जो डॉलर खर्च करुन बांधलेल्या नव्या को-या युद्धजहाजाला लागली गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:05 IST

ब्रिटनची आजवरचे सर्वात मोठे युद्धजहाज एचएमएस क्वीन एलिझाबेथमध्ये बिघाड झाला असून या युद्धजहाजामधून गळती होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे65 हजार टन वजनाची क्वीन एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात अत्याधुनिक युद्धनौका आहे.एचएमएस क्वीन एलिझाबेथची लांबी  280 मीटर (920) फुट आहे. 

लंडन - ब्रिटनचे आजवरचे सर्वात मोठे युद्धजहाज एचएमएस क्वीन एलिझाबेथमध्ये बिघाड झाला असून या युद्धजहाजामधून गळती होत असल्याचे समोर आले आहे. दोन आठवडयापूर्वीच राणीच्या उपस्थितीत समारंभपूर्वक एचएमएस क्वीन एलिझाबेथचा ब्रिटीश नौदलात समावेश करण्यात आला होता. या युद्धजहाजाच्या बांधणीसाठी तब्बल 4.2 अब्ज डॉलर्सचा खर्च आला आहे. या युद्धजहाजात तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 

65 हजार टन वजनाचे क्वीन एलिझाबेथ हे ब्रिटनचे सर्वात अत्याधुनिक युद्धजहाज आहे. समुद्र चाचणी दरम्यान या युद्धजहाजामध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले होते असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. पार्टसमाऊथ बंदरात एलिझाबेथ युद्धजहाजाची दुरुस्ती करुन गळती थांबवण्यात येईल असे रॉयल नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. एचएमएस क्वीन एलिझाबेथची लांबी  280 मीटर (920) फुट आहे. या युद्धजहाजाच्या बांधणीला आठवर्ष लागली. हे युद्ध जहाज बांधणा-या कंपनीने जेव्हा नौदलाच्या ताब्यात ही युद्धनौका सोपवली त्यावेळी त्यात काही समस्या असल्याची नौदलाला कल्पना होती असे सन वर्तमानपत्राने म्हटले आहे. जेव्हा तुम्ही खरेदी केलेल्या नव्या को-या कारमध्ये काही बिघाड असतो तेव्हा तुम्ही ती गाडी गॅरेजमध्ये पाठवता इथे सुद्धा असेच आहे असे नौदल अधिका-याने सांगितले. 

क्वीन एलिझाबेथसाठी खास अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून एफ-35 विमाने विकत घेण्यात येणार आहेत. यासाठी सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेवर संसदेच्या संरक्षण समितीने मंगळवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्वीन एलिझाबेथवर एफ-35 विमानांचा ताफा सज्ज असेल. या संपूर्ण व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव असून संरक्षण मंत्रालयाने प्रत्येक विमानाचा खर्च किती असेल त्याची माहिती दिलेली नाही असे संसदेच्या संरक्षण समितीने म्हटले आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंड