बुध ग्रहाच्या चंद्रावर लाव्हाचे तळे

By Admin | Updated: June 7, 2015 23:45 IST2015-06-07T23:45:33+5:302015-06-07T23:45:33+5:30

अमेरिकेच्या रेडिओ दुर्बिणीने बुधाभोवती फिरणाऱ्या लो या चंद्राची छायाचित्रे घेतली असून, या छायाचित्रात लोवर लाव्हाचे मोठे तळे असल्याचे दिसत आहे.

Lava pond on Mercury's moon | बुध ग्रहाच्या चंद्रावर लाव्हाचे तळे

बुध ग्रहाच्या चंद्रावर लाव्हाचे तळे

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रेडिओ दुर्बिणीने बुधाभोवती फिरणाऱ्या लो या चंद्राची छायाचित्रे घेतली असून, या छायाचित्रात लोवर लाव्हाचे मोठे तळे असल्याचे दिसत आहे. प्युअर्टो रिको सोसायटीने हे वृत्त दिले आहे.
नव्या छायाचित्रात लाव्हाचे प्रचंड तळे अगदी स्पष्ट दिसत आहे. येथील मातीतून हे तळे निर्माण झाले असावे, असे प्युअर्टो रिको सोसायटीचे उपाध्यक्ष अर्मांडो कौसेड यांनी म्हटले आहे. पृथ्वीवरील लाव्हा तळी काही शेकडा मीटर व्यासाची आहेत. नासाच्या व्हॉयेजर यानाने १९७९ साली लो चंद्राचा शोध लावला होता. या उपग्रहावरील ज्वालामुखी सौरमालेत सर्वाधिक सक्रिय आहेत. 
प्युअर्टो रिको सोसायटी ही विनानफा तत्त्वावर चालविली जाणारी शिक्षण संस्था आहे. १९८५ साली तिची स्थापना झाली असून, खगोल शास्त्राविषयी आवड निर्माण करणे तसेच हौशी खगोल संशोधनाला प्रोत्साहन देणे असे काम या सोसायटीतर्फे केले जाते. २००२ साली ही सोसायटी नासाशी संलग्न झाली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Lava pond on Mercury's moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.