मुलाला ओढत नेणाऱ्या शिक्षिकेची गेली नोकरी

By Admin | Updated: May 10, 2017 01:22 IST2017-05-10T01:22:14+5:302017-05-10T01:22:14+5:30

शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांशी आपुलकीने, प्रेमाने वागले पाहिजे; परंतु अमेरिकेत शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्याशी अतिशय वाईट वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

The last job of a school teacher | मुलाला ओढत नेणाऱ्या शिक्षिकेची गेली नोकरी

मुलाला ओढत नेणाऱ्या शिक्षिकेची गेली नोकरी

शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांशी आपुलकीने, प्रेमाने वागले पाहिजे; परंतु अमेरिकेत शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्याशी अतिशय वाईट वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्री-स्कूलची ही शिक्षिका छोट्या मुलाला शाळेच्या व्हरांड्यातून ओढत, फरपटत नेत असल्याचे दिसले. आपले हे वर्तन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले जात असल्याची जाणीव तिला नव्हती. शिक्षिकेने छोट्या मुलाला ओढत, फरपटत नेत असल्याचे फुटेज समाजमाध्यमांवर धडकताच तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या शाळेचे नाव यंगस्टाऊन असून, तेथे पाच वर्षे वयाची जवळपास ८०० मुले शिकायला आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च अल्ट्राकेअर नावाची संस्था करते.

Web Title: The last job of a school teacher