शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

लास वेगास हल्ला : हल्लेखोराने आपल्या रूममध्ये लावले होते कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:27 IST

संगीत महोत्सवाला उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींवर अंदाधुंद गोळीबार करून ५९ जणांचा बळी घेणारा हल्लेखोर स्टीफन पॅडकचा पूर्वेतिहास जाणून घेण्यासह या हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत

लास वेगास : संगीत महोत्सवाला उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींवर अंदाधुंद गोळीबार करून ५९ जणांचा बळी घेणारा हल्लेखोर स्टीफन पॅडकचा पूर्वेतिहास जाणून घेण्यासह या हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. त्याने हा भयंकर हल्ला करण्याच्या काही दिवस आधी आपल्या मैत्रिणीच्या फिलिपीनमधील बँक खात्यात १ लाख डॉलर जमा केले होते. अमेरिकेला हादरून सोडणाºया या हल्ल्याचा कट त्याने अत्यंत थंड डोक्याने रचल्याचे तपासातून उघड झाले आहे.पॅडकने हॉटेलातील आपल्या खोलीत आणि आसपास अनेक कॅमेरे लावले होते. त्यामार्फत तो हॉटेलात येणाºया-जाणाºयांसह सुरक्षा अधिकाºयांवरही पाळत ठेवून होता. मागच्या रविवारी रात्री माथेफिरू पॅडक याने हॉटेलच्या ३२व्या मजल्यावर बेभानपणे बंदुकीतून संगीत महोत्सवात धुंद असलेल्या प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव केला होता. यात ५९ जणठार, तर पाचशेहून अधिक जखमी झाले होते.त्याने हल्ला करण्यापूर्वी खिडक्या तोडल्या होत्या. गोळीबार अखंड गोळीबार करता यावा, यासाठी त्याने दोन खुर्च्या जोडून रॅक तयार केले होते. हल्ल्याच्या कटाबाबत पोलिसांना स्टीफन पॅडकच्या खोलीत एक टिपण आढळले आहे.हल्ल्याआधी त्याने बंदुकाही व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. त्याच्या खोलीत मोठा शस्त्रसाठाही आढळून आलेला आहे. त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)मैत्रीण परतली; कॅसिनोमध्ये करत होती काममनिला : लास वेगास येथे भयंकर हल्ला करणाºया स्टीफन पॅडक याची मैत्रीण मारिलोऊ डेनली फिलिपीनहून बुधवारी अमेरिकेत पोहोचली आहे. ती मंगळवारी रात्री मनिला येथील आंतरराष्टÑीय विमानतळावरून विमानाने निघाली होती. हे विमान बुधवारी सकाळी अमेरिकेत पोहोचले. एफआयबीने डेनलीचा शोध घेण्यासाठी मदत मागितली होती. ती मागच्या महिन्यात फिलिपीनला आली होती. स्टीफनने तिच्या खात्यात एक लाख डॉलरवर जमा केले होते, असे एनबीआयचे प्रवक्ते निक सुआरेज यांनी सांगितले. ती आॅस्ट्रेलियाची नागरिक असून, कॅसिनोत काम करण्यासाठी २० वर्षांपूर्वी अमेरिकेत आली होती.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद