ही सर्वांत मोठी अंतराळ दुर्बीण, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 09:03 PM2022-01-15T21:03:51+5:302022-01-15T21:04:14+5:30

Largest Space Telescope James Webb: विश्वाच्या निर्मितीचे गूढ जिच्यामुळे उकलण्यास मदत होणार आहे अशी जगातली सर्वांत मोठी, सर्वांत गुंतागुंतीची आणि सर्वांत शक्तिमान, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबरला अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली.

This is the largest space telescope, with special features | ही सर्वांत मोठी अंतराळ दुर्बीण, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

ही सर्वांत मोठी अंतराळ दुर्बीण, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

googlenewsNext

विश्वाच्या निर्मितीचे गूढ जिच्यामुळे उकलण्यास मदत होणार आहे अशी जगातली सर्वांत मोठी, सर्वांत गुंतागुंतीची आणि सर्वांत शक्तिमान, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २५ डिसेंबरला अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली. अमेरिकी अवकाश संस्था नासा ने तयार केलेली ही नवी अवकाश दुर्बीण  हबल या जुन्या अवकाश दुर्बिणीच्या तुलनेत १०० पट अधिक क्षमतेची आहे. एखाद्या टेनिसकोर्ट एवढ्या मोठ्या असलेल्या या सात टनी अवकाश दुर्बिणीच्या निर्मितीसाठी अमेरिका आणि कॅनडासह युरोपच्या २९ देशांतील शास्त्रज्ञ २००५ पासून झटत होते. या दुर्बिणीच्या कॅमेऱ्याचा आकार ६.५ मीटरचा असून त्याचं वजन ६२ क्विंटल आहे.  १९९० साली कार्यरत झालेल्या हबल अवकाश दुर्बिणीच्या कॅमेऱ्याचा आकार २.४ मीटर एवढा होता. जेम्स वेब दुर्बिणीचा कॅमेरा उणे २३० अंश सेल्सिअस तापमानातही काम करू शकेल अशा क्षमतेचा आहे. ही दुर्बीण अवकाशात पृथ्वीपासून १६ दशलक्ष किलोमीटर अंतरावर, म्हणजे चंद्राच्या जवळपास चौपट अंतरावर, स्थापित करण्यात येणार असून अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांच्या साह्याने अवकाशातील घडामोडींचा वेध घेण्याची तिची क्षमता आहे. ही दुर्बीण अवकाशातील तिच्या स्थानी पोहोचण्यास एक महिन्याचा कालावधी लागेल आणि त्यापुढे पाच महिन्यांनी ती अवरक्त किरणांच्या साह्याने अवकाशाचा वेध घेऊ लागेल. 

१३.८ अब्ज  वर्षांपूर्वीची अनेक रहस्ये उलगडू शकतील.

१० अब्ज डॉलर्स खर्च
१० वर्षे  राहील कार्यरत

Web Title: This is the largest space telescope, with special features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.