शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायूदलाचा इस्रायलच्या लष्कराबरोबर युद्धसराव; लष्करी, व्यापारी संबंधांना मिळेल चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:17 IST

इस्रायलच्या दक्षिण प्रांतामध्ये इस्रायली वायूदलाने आयोजित केलेल्या "ब्लू फ्लॅग" या लष्करी सरावामध्ये भारतासह नऊ देशांनी सहभाग घेतला आहे. गेले दोन दिवस हा सराव सुरु असून इस्रायलच्या वायूदलाने आयोजित केलेला हा आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव आहे.

ठळक मुद्देभारत हा अमेरिकेप्रमाणे इस्रायलच्या लष्करी सामुग्रीचा मोठा ग्राहक आहे. संरक्षण तंत्रज्ञानामध्येही इस्रायल भारताला मोठ्या प्रमाणात साहित्य पुरवत आहे.'ब्लू फ्लॅग' सरावामध्ये अमेरिका, ग्रीस, पोलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, भारत आणि इस्रायलचा समावेश आहे.

जेरुसलेम- इस्रायलच्या दक्षिण प्रांतामध्ये इस्रायली वायूदलाने आयोजित केलेल्या "ब्लू फ्लॅग" या लष्करी सरावामध्ये भारतासह नऊ देशांनी सहभाग घेतला आहे. गेले दोन दिवस हा सराव सुरु असून इस्रायलच्या वायूदलाच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव आहे. या सरावामध्ये अमेरिका, ग्रीस, पोलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, भारत आणि इस्रायलचा समावेश आहे. ( इस्रायलच्या संरक्षण दलांनी एका सहभागी देशाचे नाव जाहीर केलेले नाही.)

दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या सरावामध्ये भारत प्रथमच सहभागी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी इस्रायलला भेट दिली आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि इस्रायल यांचे व्यापारी तसेच राजनयिक संबंध झपाट्याने सुधारत आहेत. नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान म्हणूनही ओळखले जातील. त्यामुळेच आता या युद्धसरावात सहभागी झाल्याने दोन्ही देशांचे संबंध अधिक वृद्धींगत होत असल्याचे दिसून येते.या सरावामध्ये भारताने आपल्या वायूदलातील सी-130जे हे ट्रान्सपोर्ट विमान पाठवले असून इतर देशांनी फायटर जेट, ट्रान्सपोर्ट विमाने तसेच इंधन भरणारी विमाने पाठविली आहेत. इस्रायलच्या संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, 'या सरावामध्ये 1000 लोक सहभागी झाले असून त्यामध्ये वैमानिक, कमांडर्स तसेच तांत्रिक विभागात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. हा सराव 11 दिवस चालणार आहे. या सर्व सहभागी देशातील लोक आपापल्या विमानांमधून इस्रायलमध्ये वेळेत दाखल झाले आहेत.' ब्लू फ्लॅगचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ असून सर्वात पहिल्यांदा हा सराव 2013 साली झाला होता. यावर्षीच्या सरावाचे नियोजन एक वर्ष आधीपासूनच सुरु होते अशी माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलाने दिली. या सरावामधून तांत्रिक प्रगतीची देवणघेवाण आणि मुत्सद्दी पातळीवरील संबंध सुधारावेत हा मूळ हेतू आहे.

भारत हा अमेरिकेप्रमाणे इस्रायलच्या लष्करी सामुग्रीचा मोठा ग्राहक आहे. संरक्षण तंत्रज्ञानामध्येही इस्रायल भारताला मोठ्या प्रमाणात साहित्य पुरवत आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस वापरली जाणारी उपकरणे, रडार , ड्रोन आदी उपकरणे भारताला इस्रायल पुरवतो. भारत ही लष्करी साहित्यासाठी इस्रायलची मोठी बाजारपेठच आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये विविध संरक्षण साहित्याची देवाणघेवाण वाढिस लागली आहे.

टॅग्स :Indiaभारत