शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रशियन लष्करात नेपाळी तरुण, मोठ्या प्रमाणात भरती; युक्रेनच्या इशाऱ्यावर बंड; पुतिन झाले अधिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 06:43 IST

Russian army: रशियातील लष्करामध्ये नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. त्यातील एका सैनिकाने सांगितले की, तो नेपाळहून रशियामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता.

मॉस्को : रशियातील लष्करामध्ये नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. त्यातील एका सैनिकाने सांगितले की, तो नेपाळहूनरशियामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नेपाळमध्ये परत गेला असता तरी त्याला चांगली नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती. रशियामध्ये उत्तम रोजगाराच्या शोधात तो काही महिने थांबला, पण तशी संधी चालून आली नाही.

युक्रेनच्या युद्धात रशियाचे काही हजार सैनिक मरण पावले आहेत. त्यामुळे रशियाच्या लष्करात विदेशी युवकांची भरती करण्याचा पुतिन सरकारने विचार केला. त्यासाठी नियमांत बदल करण्यात आले. त्यामुळे नेपाळच्या शेकडो युवकांना रशिया लष्करात दाखल होण्याचा मार्ग खुला झाला. युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे नागरिकत्व मिळविण्याबाबतचे नियम पुतिन सरकारने आणखी सुलभ केले आहेत. 

बंड करणारे गद्दार : पुतिन सत्तेसाठी सर्वात मोठा धोका ठरलेल्या बंडाच्या विरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आक्रमक झाले असून, बंड पुकारणाऱ्यांना त्यांनी गद्दार म्हटले आहे. युक्रेन आणि इतर देशांच्या इशाऱ्यावर गद्दारांनी बंड केले, अशी टीका त्यांनी केले. भाषणादरम्यान, पुतिन अतिशय कठोर झाल्याचे आणि थकलेले दिसले.

रशियाचा नेपाळशी करार नाहीनेपाळी युवकांना रशियाच्या लष्करात सामील करून घ्यायचे असेल तर तसा दोन्ही देशांत करार होणे आवश्यक आहे. मात्र तशी पावले न टाकता रशियाने परस्पर नेपाळी युवकांना लष्करात भरती करण्यास सुरुवात केली. त्याबद्दल नेपाळच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमधील युवक नोकरीसाठी रशियामध्ये जातात. त्यामुळे त्यांना रोखणेही अशक्य आहे, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

वॅगनरचे प्रमुख प्रिगोझिन यांच्यावरील गुन्हे रद्द-रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात बंड पुकारणारे वॅगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन व अन्य काही व्यक्तींवर देशविरोधी कृत्यांबाबत दाखल केलेले गुन्हे रद्दबातल करण्यात आले. पुतिन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. बंडखोरांचा मुकाबला करण्यासाठी रशियाचे लष्कर व पोलिसांनी तातडीने पावले उचलली व यादवी युद्ध टाळले. त्यासाठी या यंत्रणांचे पुतिन यांनी आभार मानले आहेत. -पुतिन म्हणाले की, वॅगनरने केलेल्या बंडाला रशियाचे लष्कर, नागरिकांनी पाठिंबा दिला नव्हता. अशा गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांना २० वर्षे कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद रशियाच्या कायद्यांत आहे.

बेकारीमुळे युवक हैराणनेपाळमध्ये बेकारीचे प्रमाण ११ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे तेथील युवक रोजगारासाठी रशियाकडे धाव घेत आहेत. पात्र उमेदवारांना रशियाने लष्कराचे दरवाजे खुले केले. त्याचा फायदा नेपाळी युवकांनी घेतला आहे. 

प्रिगोझिन सध्या आहेत तरी कुठे? अल्पकाळाचे बंड पुकारणारे येवगेनी प्रिगोझिन हे सध्या बेलारुसमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यांची बेलारुसमध्ये हकालपट्टी केली जाणार आहे, असे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाNepalनेपाळ