शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कोरोना व्हॅक्सीनसाठी 'या' भारतीय उद्योगपतीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला दिले 3300 कोटी रुपयांचे अनुदान, म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 20:01 IST

कोरोना महामारीनंतर जगाला कुठल्याही प्रकारच्या महामारीसाठी पूर्णपणे तयार राहावे लागेल. या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजेनर इंस्टिट्यूटची स्थापना 2005मध्ये ऑक्सफर्ड आणि यूके इंस्टिट्यूट फॉर अॅनिमल हेल्थ सोबत पार्टनरशिपमध्ये करण्यात आली होती.मित्तल परिवाराने हे अनुदान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सीनॉलॉजी विभागाला दिले आहे.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल सुरू आहे.

नवी दिल्ली - स्टील टॉयकून लक्ष्मी निवास मित्तल यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना व्हॅक्सीनसाठी 3.5 मिलियन पाउंडचे (जवळपास 3300 कोटी रुपये) अनुदान दिले आहे. मित्तल परिवाराने हे अनुदान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या  व्हॅक्सीनॉलॉजी विभागाला दिले आहे. हे जेनर इंस्टिट्यूट अंतर्गत येते. या अनुदानानंतर आता याचे नाव लक्ष्मी मित्तल अॅन्ड फॅमिली प्रोफेसरशिप ऑफ व्हॅक्सीनॉलॉजी, असे झाले आहे.

व्हॅक्सीन विश्वात प्रसिद्ध -जेनर इंस्टिट्यूटची स्थापना 2005मध्ये ऑक्सफर्ड आणि यूके इंस्टिट्यूट फॉर अॅनिमल हेल्थ सोबत पार्टनरशिपमध्ये करण्यात आली होती. व्हॅक्सीनच्या अभ्यासासाठी हे इंस्टिट्यूट जगात अव्वल दर्जाचे मानले जाते. कोरोना महामारीच्या काळात व्हॅक्सीन तयार करण्याच्या दिशेने या इंस्टिट्यूटमध्ये वेगाने काम सुरू आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मोठ्या प्रमाणावर ह्युमन ट्रायलचे काम सरू - ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल सुरू आहे. प्रफेसर अँड्रिअन हिल जेनर इंस्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. आतापर्यंत संपूर्ण जगात 1 कोटी 23 लाख लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेपाच लाख हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जगाला महामारीसाठी तयार राहावे लागेल -कोरोना महामारीसंदर्भात बोलताना लक्ष्मी मित्तल म्हणेल, कोरोना महामारीनंतर जगाला कुठल्याही प्रकारच्या महामारीसाठी पूर्णपणे तयार राहावे लागेल. या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच प्रफेसर हिल हे व्हॅक्सीन निर्मितीचे फार मोठे काम करत आहेत, असेही मित्तल म्हणाले.

रशियन व्हॅक्‍सीन पोहोचली तिसऱ्या टप्प्यातऑक्सफर्ड शिवाय रशियन डिफेन्स मिनिस्‍ट्रीने तयार केलेली व्हॅक्‍सीनही प्रभावी ठरत आहे. ही व्हॅक्सीन आता क्लिनिकल ट्रायलच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना ही व्हॅक्‍सीन देण्यात आली, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. तसेच, व्हॅक्‍सीनमुळे कसल्याही प्रकारचा साइड इफेक्‍टदेखील दिसून आलेला नाही. ही व्हॅक्सीन ज्या व्हॅलंटियर्सना देण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील इम्‍यूनिटी डेव्हलप होताना दिसत आहे. प्रोटोकॉल्सनुसार या व्हॉलंटियर्सची नियमितपणे अँटीबॉडी टेस्‍ट करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडIndiaभारत