इस्साक हरझोग इस्रायलचे अध्यक्ष; ८७ सदस्यांच्या पाठिंब्यानं दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:25 AM2021-06-03T06:25:28+5:302021-06-03T06:25:46+5:30

इस्रायलच्या माजी अध्यक्षांचा मुलगा अध्यक्ष बनणारे हरझोग पहिलेच.

Labor Veteran Isaac Herzog Elected Israels 11th President | इस्साक हरझोग इस्रायलचे अध्यक्ष; ८७ सदस्यांच्या पाठिंब्यानं दणदणीत विजय

इस्साक हरझोग इस्रायलचे अध्यक्ष; ८७ सदस्यांच्या पाठिंब्यानं दणदणीत विजय

googlenewsNext

जेरूसलेम : इस्रायलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते इस्साक हरझोग (वय ६०) निवडून आले आहेत. नॅसेटमध्ये (संसद) झालेल्या गुप्त मतदानात माजी मजूर नेते हरझोग यांना ८७ मते मिळाली. ते देशाचे ११ वे अध्यक्ष आहेत. हरझोग यांचे वडील चेम हरझोग हे देशाचे १९८३ आणि १९९३ दरम्यान अध्यक्ष 
होते. 

इस्रायलच्या माजी अध्यक्षांचा मुलगा अध्यक्ष बनणारे हरझोग पहिलेच. इस्साक हरझोग यांनी १२० सदस्यांच्या संसदेत ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळवून प्रतिस्पर्धी मिरिएम पेरेटझ यांचा पराभव केला. विद्यमान अध्यक्ष रियुवेन रिव्हलिन यांची जागा हरझोग घेतील व त्यांचा सात वर्षांचा कार्यकाळ ९ जुलै रोजी सुरू होईल.

Web Title: Labor Veteran Isaac Herzog Elected Israels 11th President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.