शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कायली जेन्नर : जगातली सर्वांत तरुण अब्जाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 01:24 IST

या महिन्याच्या सुरुवातीला फोर्ब्ज मासिकाने अमेरिकेच्या २१ वर्षीय कायली जेन्नरला आपल्या ‘नाईन झिरो’ या अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश दिला.

- सोपान पांढरीपांडे ।या महिन्याच्या सुरुवातीला फोर्ब्ज मासिकाने अमेरिकेच्या २१ वर्षीय कायली जेन्नरला आपल्या ‘नाईन झिरो’ या अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे ती जगातली सर्वात कमी वयात अब्जाधीश बनणारी म्हणजे १०० कोटी डॉलर्स (७००० कोटी रुपये) संपत्ती असलेली अब्जाधीश ठरली आहे. यापूर्वी हा मान २००८ साली फेसबुकच्या मार्क झुकरबर्गला मिळाला होता. त्यावेळी मार्क २३ वर्षाचा होता.कायली ही सौंदर्यवती स्त्रियांची खाण समजल्या जाणाऱ्या कर्दाशियान जेन्नर या रियालिटी टीव्हीवर येणाऱ्या कुटुंबाची सदस्य आहे व ती कायली कॉस्मेटिक्स ही सौंदर्य प्रसाधने बनवणारी कंपनी चालवते. गेल्या वर्षी या कंपनीची उलाढाल ३६० दशलक्ष डॉलर्स म्हणजे २५,२०० कोटी रुपये होती.फोर्ब्ज मासिकाच्या यादीत जगातले २२०८ अब्जाधीश आहेत. त्यात कायलीचा २१५७ वा क्रमांक लागतो. सर्वात पहिला नंबर अ‍ॅमॅझॉन डॉट कॉमच्या जेफ बेझोस यांचा लागतो. त्यांचेकडे १३१ अब्ज डॉलर्स संपत्ती आहे.कायली कॉस्मेटिक्सची ७५ टक्के उलाढाल सोशल मीडियामार्फत होते. इन्स्टाग्रामवर कायली जेन्नरचे १२८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर स्नॅपचॅटवर २६.७० दशलक्ष फॉलोअर्स आहेत.सोशल मीडियावर कायली कॉस्मेटिक्सची सौंदर्य प्रसाधने आपल्याला मिळालीच पाहिजे यासाठी तीव्र स्पर्धा असते. याचे प्रमुख कारण प्रत्येक प्रसाधन अगदी माफक संख्येतच उपलब्ध असण्याची जाहिरात करण्याची कायली जेन्नरची हातोटी. त्यामुळे कायली कॉस्मेटिक्सची उत्पादने हातोहात खपतात.कायलीच्या उद्योगशीलतेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्वत: कुठलीच सौंदर्य प्रसाधने बनवत नाही. कायली फक्त एखाद्या सौंदर्य प्रसाधनाची कल्पना सादर करते व नंतर त्याचे उत्पादन मात्र सीड ब्युटी ही वेगळी कंपनी करते. मालाच्या आॅर्डर्स घेऊन विकण्याचे काम शॉपीफाय नावाची कॅनेडियन कंपनी करते. ही कंपनी कायलीची सौंदर्य प्रसाधने त्यांच्या ड्रेक आणि जस्टीन बायबर नावाच्या स्टोअर्समधून सुद्धा विकतात.यामुळे कायलीला कंपनीत फारसे काही करावे लागत नाही व ती आपला वेळ रियालिटी टीव्ही शोज व मॉडेलिंगला देऊ शकते. टीव्ही शो व मॉडेलिंगमधून मिळणाºया प्रसिद्धीचा उपयोग करत कायली आपला व्यवसाय वाढवत असते.कायली कॉस्मेटिक्सची सुरुवात २०१५ मध्ये झाली. रियालिटी टीव्ही व मॉडेलिंगमधून मिळालेले २.५० लाख डॉलर्स गुंतवून कायलीने ही कंपनी स्थापन केली व त्यानंतर तिने कधी मागे वळून बघितलेच नाही. आता अब्जाधीश म्हणून घोषित झाल्यावर कायली यशाची आणखी उंच शिखरे पादाक्रांत करणार आहे, हे सांगायला ज्योतिष्याची आवश्यकताच नाही.- गेल्या वर्षी कायलीने बाजारात आणलेल्या ‘लिप किटस्’चे देता येईल. कायलीचे ओठ अतिशय मादक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचाच फायदा उठवत कायलीने या कायली लिप किटस् आणल्या होत्या आणि गंमत म्हणजे तब्बल २९ डॉलर्स (२०३० रुपये) किंमत असलेल्या सर्व लिप किटस् केवळ एका मिनिटात सोशल मीडियावर विकल्या गेल्या आणि त्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली.- केवळ १२ कर्मचारीत्यात ५ पार्टटाइममजेची बाब जगातल्या अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील असलेल्याकायली जेन्नर यांच्या कॉस्मेटिक्समध्ये केवळ१२ कर्मचारी आहेत आणि त्यातही पाच कर्मचारी अर्धावेळ म्हणजे पार्टटाईम आहेत. कंपनीचे आर्थिक व्यवहार कायलीच्या मातोश्री क्रिस जेन्नर बघतात व त्यासाठी त्या १० टक्के मोबदला कायलीकडून घेतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके