उंदरांमुळे रेस्टॉरंटवर कुऱ्हाड

By Admin | Updated: September 25, 2015 00:25 IST2015-09-25T00:25:33+5:302015-09-25T00:25:33+5:30

येथे एका भारतीय व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये अन्नात चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याने हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात एका तपासणीत ही बाब उघड झाली होती.

Kurund to the Restaurant due to the rats | उंदरांमुळे रेस्टॉरंटवर कुऱ्हाड

उंदरांमुळे रेस्टॉरंटवर कुऱ्हाड

लंडन : येथे एका भारतीय व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये अन्नात चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याने हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात एका तपासणीत ही बाब उघड झाली होती.
मूळ भारतीय असलेल्या बलवीर सिंग यांचे डर्बी शहरात हे रेस्टॉरंट आहे. एका नियमित तपासणीत रेस्टॉरंटमध्ये अन्नात व इतरत्र काही उपकरणांमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने हे रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला. या रेस्टॉरंटमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली. या प्रकारामुळे फूड पॉयझनिंगचा धोका लक्षात घेता रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि कारवाईही करण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: Kurund to the Restaurant due to the rats