शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कुलभूषण यांच्या पत्नी व आईला पाकचा व्हिसा, २५ डिसेंबरला भेट घेणार; भारतातर्फे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:17 AM

इस्लामाबाद : पाकिस्तानात देहदंडाची शिक्षा सुनावले गेलेले कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मदफैसल यांनी शुक्रवारी येथे सांगितले. हा निर्णय पाकने भारताला कळवला आहे.जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा, अशी मागणी भारताने काही ...

इस्लामाबाद : पाकिस्तानात देहदंडाची शिक्षा सुनावले गेलेले कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मदफैसल यांनी शुक्रवारी येथे सांगितले. हा निर्णय पाकने भारताला कळवला आहे.जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा, अशी मागणी भारताने काही महिन्यांपूर्वी केली होती. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. मात्र आता पाकने व्हिसा जारी केल्याने जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट होईल; पण तेव्हा तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचारीही उपस्थित राहतील. जाधव यांची पत्नी आणि आईला तिथे सुरक्षा पुरवली जाईल.स्वराज यांचा पाठपुरावायापूर्वी पाकने जाधव यांच्या पत्नीला पतीला भेटण्यास १० नोव्हेंबर रोजी परवानगी दिली होती. जाधव यांच्या मातोश्री अवंतिका यांना मुलाला भेटण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून व्हिसा द्यावा यासाठी भारताने सातत्याने पाठपुरावा केला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याच प्रश्नावर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल महमूद यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती.कुलभूषण जाधवहे नौदलाचे माजी अधिकारी असून, निवृत्तीनंतर व्यावसायिक कामासाठी ते इराणला गेले असता, तिथे त्यांना पाकिस्तानने अटक केली. ते भारतासाठी हेरगिरी करीत असून, त्यांना ३ मार्च रोजी बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला. त्यांच्या फाशीला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले असून, १३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने आपले म्हणणे सादर करावे, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवVisaव्हिसाPakistanपाकिस्तान