अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधवांना फाशी नाही, पाकिस्तानला दणका

By Admin | Updated: May 18, 2017 16:46 IST2017-05-18T16:05:52+5:302017-05-18T16:46:36+5:30

हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे

Kulbhushan Jadhav is not hanged till the final result, Pakistan bombshell | अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधवांना फाशी नाही, पाकिस्तानला दणका

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधवांना फाशी नाही, पाकिस्तानला दणका

>
ऑनलाइन लोकमत
दी हेग (नेदरलँडस्), दि. 18 - हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल सुनावला. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं असून यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला असून भारताला दिलासा मिळाला आहे. 
 
कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका असून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत फाशी देऊ नये. जाधव सुरक्षीत असल्याची हमी द्या असं न्यायालयाने सांगितलं. दुपारी 3.30 वाजता न्यायालयाने निकाल वाचनास सुरुवात केली. 
 
यावेळी न्यायालयाने पाकिस्तानला चांगलंच फटाकरलं. कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे असं न्यायालयाने सांगितलं. कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं. तसंच 1977 व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदतही मिळायला हवी होती असं सांगत न्यायालयाने पाकिस्तानला फटकारलं. 
 
 कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेला हेरगिरीचा आरोप सिद्ध झालेला नाही. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचे अद्याप अस्पष्ट असून पाकचे पुरावे पुरेसे नाहीत असं न्यायालयाने स्पष्ट केलं. कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांकडून मान्य केलं आहे. कुलभूषण जाधव हेर आहेत की नाही हे सिद्ध झालं नाही, कुलभूषण यांनी हेरगिरी केली हा पाकचा दावा टिकणारा नाही असं म्हणणं न्यायालयाने मांडलं. 
 
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
 

Web Title: Kulbhushan Jadhav is not hanged till the final result, Pakistan bombshell