पराभवाचा ठपका कोमींवर
By Admin | Updated: November 14, 2016 01:40 IST2016-11-14T01:40:17+5:302016-11-14T01:40:17+5:30
आपल्या धक्कादायक पराभवाचा दोष हिलरी क्लिंटन यांनी फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कोमी यांना दिला आहे.

पराभवाचा ठपका कोमींवर
वॉशिंग्टन : आपल्या धक्कादायक पराभवाचा दोष हिलरी क्लिंटन यांनी फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कोमी यांना दिला आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असताना कोमी यांनी माझ्या ईमेल अकाऊंट्सच्या पुन्हा चौकशी करण्याच्या निर्णयामुळे माझ्या विजयाला पूर्णविराम लागला, असा दावा क्लिंटन यांनी केला आहे. ही निवडणूक का जिंकता आली नाही याची अनेक कारणे आहेत. संशय व्यक्त करणारे कोमी यांचे पत्र हे निराधार होते व त्यामुळे आमचा प्रवास थांबला, असे आमचे विश्लेषण असल्याचे, असे क्लिंटन यांनी शनिवारी त्यांच्यासाठी निधी गोळा करणारे डेमोकॅट्स व देणगीदारांच्या परिषदेत बोलताना सांगितले. त्यांचा हा संवाद सुमारे अर्धा तास चालला परंतु तो वृत्तपत्रांना उपलब्ध करण्यात आला नाही. कोमी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पत्र लिहिपर्यंत माझी प्रचार मोहीम विजयाकडेच जाणारी होती, असेही क्लिंटन म्हणाल्या. त्या पत्रात कोमी यांनी ईमेल घोटाळ््याची चौकशी पुन्हा सुरू केल्याचे म्हटले होते. ६ नोव्हेंबर रोजी कोमी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पाठविलेल्या पत्रात नव्याने केलेल्या चौकशीत नवे सापडले नसल्याचे कळविले होते. (वृत्तसंस्था)