हुषार भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेला गरज - डोनाल्ड ट्रम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 14:19 IST2016-03-15T14:19:15+5:302016-03-15T14:19:15+5:30

अमेरिकेत शिकणारे भारतीय विद्यार्थी हुषार असतात, त्यामुळे त्यांना शिक्षण संपल्यावर देशातून घालवू नये

Knowledgeable Indian students need America - Donald Trump | हुषार भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेला गरज - डोनाल्ड ट्रम्प

हुषार भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेला गरज - डोनाल्ड ट्रम्प

>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 15 - अमेरिकेत शिकणारे भारतीय विद्यार्थी हुषार असतात, त्यामुळे त्यांना शिक्षण संपल्यावर देशातून घालवू नये असं मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे. याआधी भारतीय कर्मचारी अमेरिकी नागरिकांचा रोजगार हिरावतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलताना, आपल्याला आवडो वा न आवडो परंतु मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी इथं शिकतात आणि ते अत्यंत हुषार असतात, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आपल्याला गरज आहे असं ट्रम्प म्हणाले. 
वर्गामध्ये अभ्यासात सगळ्यात पुढे भारतीय विद्यार्थी असतात, ते इथं शिकतात, मग भारतात जातात, तिथं कंपन्या सुरू करतात आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करतात असं ट्रम्प यांनी सांगितले. 
अनेक भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर इथं रहायचं असतं, परंतु आपण ती संधी न देता त्यांना घालवतो, ही परिस्थिती बदलायला हवी अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Knowledgeable Indian students need America - Donald Trump