लंडन मेट्रो स्थानकात चाकू हल्ला, ३ जखमी
By Admin | Updated: December 6, 2015 13:57 IST2015-12-06T13:49:30+5:302015-12-06T13:57:36+5:30
पूर्व लंडनच्या लियटॉनस्टोन मेट्रो स्थानकावर शनिवारी एका हल्लेखोराने प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली.

लंडन मेट्रो स्थानकात चाकू हल्ला, ३ जखमी
ऑनलाईन लोकमत
लंडन, दि. ६ - पूर्व लंडनच्या लियटॉनस्टोन मेट्रो स्थानकावर शनिवारी एका हल्लेखोराने प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. ब्रिटीश पोलिस या घटनेचा दहशतवादी हल्ल्याच्या अंगाने तपास करत आहेत. हल्लेखोरांने तिघांवर चाकू हल्ला केला. गळयावर वार झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून, दोघांना किरकोळ दुखापती झाली आहे.
सोबत चाकू घेऊन आलेला हा हल्लेखोर मी सिरियासाठी हे करतोय असे ओरडत होता. तीन दिवसांपूर्वीच ब्रिटीश संसदेने सिरियातील इसिसच्या तळांवर हवाई हल्ल्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर लगेचच ही घटना घडली. वरवर पाहता ही घटना तितकी गंभीर वाटत नसली तरी, हल्लेखोराने सिरियाचे नाव घेतल्याने ब्रिटीश तपास यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याच्या दिशेने तपास सुरु केला आहे.