लंडनमध्ये चाकू हल्ला, १ महिला ठार, ६ जखमी
By Admin | Updated: August 4, 2016 07:27 IST2016-08-04T07:27:46+5:302016-08-04T07:27:46+5:30
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये एका इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात एक महिला ठार झाली असून, सहाजण जखमी झाले आहेत.

लंडनमध्ये चाकू हल्ला, १ महिला ठार, ६ जखमी
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ४ - इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये एका इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात एक महिला ठार झाली असून, सहाजण जखमी झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रसेल स्कवेअर चौकात ही घटना घडली.
घटनास्थळावरुन हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यामागे दहशतवादाचा उद्देश असून शकतो त्या अंगाने तपास सुरु आहे अशी माहिती लंडन पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्येही अशाच प्रकारची चाकू हल्ल्याची घटना घडली होती.