मिठी मारण्याच्या बहाण्याने ट्रम्पने घेतले चुंबन, पॉर्नस्टारचा आरोप

By Admin | Updated: October 25, 2016 14:39 IST2016-10-25T14:32:49+5:302016-10-25T14:39:58+5:30

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक जबरदस्तीचे आरोप केलेले असताना त्यामध्ये आता एका पॉर्नस्टारची भर पडली आहे.

Kissed by Trump with a hug, and Pornstar's accusations | मिठी मारण्याच्या बहाण्याने ट्रम्पने घेतले चुंबन, पॉर्नस्टारचा आरोप

मिठी मारण्याच्या बहाण्याने ट्रम्पने घेतले चुंबन, पॉर्नस्टारचा आरोप

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २५ - अमेरिकेतील विविध क्षेत्रातील महिलांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक जबरदस्तीचे आरोप केलेले असताना त्यामध्ये आता एका पॉर्नस्टारची भर पडली आहे. एकापाठोएक महिलांकडून होत असलेल्या या आरोपांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारमोहिम पूर्णपणे संकटात सापडली आहे. 
 
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचे जे पूर्वानुमान आहे त्यामध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिटंन यांनी त्यांच्यावर आघाडी घेतली आहे. जेसिका ड्रेक या पॉर्नस्टारने ट्रम्प यांच्यावर लैंगिक जबरदस्तीचा आरोप केला असून, असा आरोप करणारी ती ११ वी महिला आहे. 
 
सन २००६ मध्ये नेवाडा येथे एका चॅरिटी गोल्फ स्पर्धेच्या निमित्ताने जेसिकाची ट्रम्प यांच्याबरोबर ओळख झाली. ट्रम्प यांनी पहिल्या भेटीतच आपल्याकडे फोन नंबर मागितला व त्याच दिवशी रात्री त्यांनी मला ते रहात असलेल्या सूटमध्ये बोलावले. एकटीला जाणे मला योग्य वाटले नाही त्यामुळे मी आणि आणखी दोन महिला ट्रम्प यांना भेटण्यासाठी गेलो. 
 
त्यावेळी मिठ्ठी मारण्याच्या बहाण्याने ट्रम्प यांनी आम्हाला गच्च पकडले व परवानगी न घेता चुंबन घेतले असा आरोप जेसिकाने केला आहे. तीस ते ४५ मिनिटानंतर आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो. त्यानंतर ट्रम्प यांच्या एका प्रतिनिधीचा मला फोन आला त्यांनी मला एकटीला रुममध्ये बोलावले होते. पण मी नकार दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वत: मला फोन करुन डिनरला, पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले पण मी त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. नेहमीप्रमाणे ट्रम्प यांच्या गोटातून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. 
 

Web Title: Kissed by Trump with a hug, and Pornstar's accusations