शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

King Charles III Coronation : "मी सेवा करायला आलोय", ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 19:14 IST

King Charles III Coronation : शनिवारी संध्याकाळी म्हणजेच 6 मे रोजी औपचारिकपणे राज्याभिषेक करताना कॅंटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी यावेळी किंग चार्ल्स यांना राजमुकूट घातला.

लंडन : किंग चार्ल्स (तृतीय) यांचा शनिवारी संध्याकाळी ब्रिटनचे राजे म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. किंग चार्ल्स यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात आपल्या आई राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचे राजे ही पदवी स्वीकारली होती. यानंतर शनिवारी संध्याकाळी म्हणजेच 6 मे रोजी औपचारिकपणे राज्याभिषेक करताना कॅंटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी यावेळी किंग चार्ल्स यांना राजमुकूट घातला. जो इंग्लंडच्या राजाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. 

आर्चबिशपने आपला राज्याभिषेक घोषित केल्यानंतर किंग चार्ल्स यांनी ख्रिश्चनांच्या पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली. शपथ घेताना ते म्हणाले की, मी राज्य करण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो आहे. तसेच, राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्यांनी 'गॉड सेव्ह द किंग' हे गीत गायले. आर्चबिशपने तेथे उपस्थित सर्व धर्माच्या लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की, चर्च ऑफ इंग्लंड अशा वातावरणाला प्रोत्साहन देते ज्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा समान आदर केला जातो. त्यानंतर चार्ल्स यांनी नेहमी कायद्याचे पालन करण्याची आणि विश्वासू प्रोटेस्टंट राहण्याची शपथ घेतली.

दरम्यान, किंग चार्ल्स यांचा हा औपचारिक राज्याभिषेक सोहळा ब्रिटनचे शाही चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्टमिन्स्टर ॲबे याठिकाणी झाला. ब्रिटनमधील नागरिकांचेच नव्हे तर जगभरातल्या अनेक लोकांचे लक्ष या राज्याभिषेक सोहळ्याकडे लागले होते. या वेळी हिंदू, शीख, मुस्लिम, बौद्ध आणि ज्यू समुदायांचे धार्मिक नेते आणि प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांचाही राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना कोणती शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. तसेच, राजघराण्यातील सदस्यांचे आणि विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे सैन्याने स्वागत केले.

सिंहासनाचा काय आहे इतिहास?राज्याभिषेकासाठी 700 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले सिंहासन वापरले. हे आसन सर्वात आधी एडवर्ड द कन्फेसर यांनी वापरले होते. हे सिंहासन 152  किलो दगडांपासून तयार करण्यात आले होते, त्याला स्टोन ऑफ डेस्टिनी असेही म्हणतात. स्कॉटलंडच्या राज्यकर्त्यांनी अनेक दशके त्याचा वापर केला होता. त्यानंतर इंग्लंडचे राजे एडवर्ड (प्रथम) यांनी 1296 मध्ये ते हस्तगत केले. पुढे 1603 मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंडचे राजघराणे एक झाले. माजी पंतप्रधान जॉन मेजर यांनी 1996 मध्ये ते स्कॉटलंडला परत केले होते. ते गेल्या आठवड्यात खास राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये परत आणले. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय