शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी पाहिलात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 08:00 IST

आतापर्यंत बंदिस्त वर्तुळात वावरणाऱ्या किम यांचा हा मोकळाढाकळा अंदाज पाहून सिंगापूरमधील लोक चकित झाले. 

सिंगापूर- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट मंगळवारी सकाळी पार पडली. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता हे दोन्ही नेते भेटले. जागतिक शांततेच्यादृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटकांचे या भेटीकडे लक्ष लागले होते. त्यामुळे सिंगापूरमध्ये या दोन्ही नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर प्रसारमाध्यमे बारकाईने लक्ष ठेवून होती. यावेळी किम जोंग उन हे नेहमीची सुरक्षा बाजुला सारुन मोकळेपणाने वावरताना दिसले. त्यांनी सोमवारी रात्री सिंगापूरचा फेरफटका मारला. यावेळी ते स्थानिक नेत्यांशी बोलताना व त्यांच्यासोबत सेल्फी घेतानाही दिसले. आतापर्यंत बंदिस्त वर्तुळात वावरणाऱ्या किम यांचा हा मोकळाढाकळा अंदाज पाहून सिंगापूरमधील लोक चकित झाले. शहरात फेरफटका मारताना सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांनी किम जोंग उन यांच्यासोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतआहे. किम जोंग उन यांचा हा पहिलावहिला सेल्फी असल्याचे सांगितले जाते. किम जोंग उन रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या हॉटेलमधून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. किम जोंग उन हे मरिना बे सँड्स या सिंगापूरमधील प्रतिष्ठित हॉटेलच्या ५६ व्या मजल्यावर गेले. या हॉटेलच्या ५६ व्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक असून तिथून एका बाजूला अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला सिंगापूर न्याहाळता येतो. किम जोंग उन बराच वेळ ऑब्झर्व्हेशन डेकवर थांबले होते.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनKim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूर