शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

किम जोंग ट्रेनने रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत महत्वाची बैठक; दोघांमध्ये काय शिजतंय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 20:44 IST

उत्तर कोरियाचे सुप्रीमो किम जोंग उन विशेष ट्रेनने रशियात गेले आहेत.

Nort Koria Russia: उत्तर कोरियाचे सुप्रीमो किम जोंग उन (Kim Jong Un) रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्यंची गुप्त बैठक होणार आहे. ही बैठक कुठे होणार आणि या बैठकीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे किम जोंग विमानाऐवजी चक्क ट्रेनने रशियात दाखल झाले. मंगळवारीत त्यांची ट्रेन रशियात पोहचल्यानंतर स्टेशनवर जोरदार स्वागत झाले. 

रशियातील व्लादिवोस्तोक शहरात किम जोंग आणि पुतिन यांची भेट होऊ शकते. 2019 नंतर किम जोंग आणि पुतिन यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे अधिकारी जॉन किर्बी यांनी 30 ऑगस्ट रोजी सांगितले होते की, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात शस्त्र कराराबाबत चर्चा सुरू आहे.

शस्त्र-तंत्रज्ञानाचा करारयुक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. यामुळेच रशिया आता शस्त्रास्त्रांसाठी उत्तर कोरियाशी हातमिळवणी करत आहे. उत्तर कोरियाने गेल्या वर्षीच रशियाला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे दिली होती. शस्त्रांस्त्र बदल्यात उत्तर कोरिया रशियाकडून तंत्रज्ञान मागू शकतो, असा दावा जॉन किर्बी यांनी केला आहे. असे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. उत्तर कोरियावरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र रशियाकडून तंत्रज्ञान मिळाल्यास त्यांचा शस्त्रसाठा वाढवू शकतो.

दोघांमधील वाढती लष्करी मैत्रीउत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी मैत्री लक्षणीयरित्या वाढत आहे. अमेरिकेचा दावा आहे की, सप्टेंबर 2022 मध्ये उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात तोफा आणि दारुगोळा रशियाला दिला होता. जानेवारी 2023 मध्येही उत्तर कोरियाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची खाजगी सेना म्हणवल्या जाणाऱ्या वॅगनर ग्रुपला रॉकेट आणि क्षेपणास्त्रे पुरवली होती. एवढेच नाही तर अमेरिकेने उत्तर कोरिया आणि रशियाच्या सीमेचा एक सॅटेलाइट फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये एक ट्रेन प्राणघातक शस्त्रे घेऊन जाताना दिसत होती.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उनVladimir Putinव्लादिमीर पुतिन