पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या

By Admin | Updated: July 16, 2016 13:23 IST2016-07-16T12:24:41+5:302016-07-16T13:23:19+5:30

ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली.

Killer of Pakistani model Lanke Baloch | पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १६ - कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी  पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोच हिची मुलतान येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कंदील हिच्या भावानेच तिची हत्या केल्याचे वृत्त आहे. मात्र ही हत्या नेमकी का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कंदीलच्या हत्येनंतर ती भाऊ फरार झाला आहे. 
पाकिस्तानमधील प्रसिद्ध मॉडेल असलेली कंदील ही तिचे फोटो व खळबळजनक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असायची. काही महिन्यांपूर्वीच तिने विराट कोहलीबद्दल प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तर त्यापूर्वी तिने 
पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकल्यास स्ट्रीप डान्स करण्याची खळबळजनक घोषणा केली होती. 
 
 

Web Title: Killer of Pakistani model Lanke Baloch