पाकची खुमखुमी; वरचष्मा न ठेवण्याचा इशारा

By Admin | Updated: October 11, 2014 03:54 IST2014-10-11T03:54:23+5:302014-10-11T03:54:23+5:30

भारत-पाक सीमा नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न करताना, पाकिस्तानने भारताला गोळीबार तात्काळ थांबविण्याची सूचना तर केलीच

Khukkhumi of Pakistan; No warning signs | पाकची खुमखुमी; वरचष्मा न ठेवण्याचा इशारा

पाकची खुमखुमी; वरचष्मा न ठेवण्याचा इशारा

इस्लामाबाद : भारत-पाक सीमा नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न करताना, पाकिस्तानने भारताला गोळीबार तात्काळ थांबविण्याची सूचना तर केलीच; पण त्याचबरोबर आपल्या अण्वस्त्रांचा सूचक उल्लेख करताना, दोन्ही देशांना परस्परांच्या क्षमतांची जाणीव आहे, युद्ध हा पर्याय नाही, असेही बजावले आहे.
पाकिस्तानचे हे निवेदन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाकिस्तानला सीमारेषेवर शांतता हवी आहे व भारत -पाक यांच्यातील संबंध सुरळीत व्हावेत अशीही इच्छा आहे; पण तणाव कमी करण्याचे आमचे प्रयत्न ही आमची दुर्बलता समजू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. पाकची प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्व यांना आव्हान देण्याच्या प्रयत्नाला संपूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर दिले जाईल. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Khukkhumi of Pakistan; No warning signs