शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:23 IST

Khaleda Zia Death: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे ढाका येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ढाका: बांगलादेशच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बांगलादेशच्या राजकारणातील एका मोठ्या अध्यायाचा अंत झाला आहे.

मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास खालिदा झिया यांनी अखेरचा श्वास घेतला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (BNP) त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. २३ नोव्हेंबरपासून त्यांना फुफ्फुस आणि हृदयाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ डिसेंबरपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी बांगलादेशसह अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात होते. खालिदा झिया यांचे निधन अशा वेळी झाले आहे जेव्हा बांगलादेश एका मोठ्या राजकीय संकटातून जात आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र तारिक रहमान १७ वर्षांच्या वनवासानंतर नुकतेच मायदेशी परतले आहेत. 

प्रदीर्घ आजारपण आणि संघर्ष

खालिदा झिया या लिव्हर सिरोसिस, संधिवात, मधुमेह आणि किडनीशी संबंधित गंभीर आजारांनी त्रस्त होत्या. शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांना दीर्घकाळ नजरकैदेत राहावे लागले होते. अलीकडेच त्यांना उपचारासाठी परदेशात नेण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने ते शक्य झाले नाही.

राजकीय कारकीर्द आणि वारसा

१५ ऑगस्ट १९४५ रोजी जन्मलेल्या खालिदा झिया यांनी पती माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी तीन वेळा बांगलादेशचे पंतप्रधानपद भूषवले. त्या बांगलादेशच्या पहिल्या आणि मुस्लीम जगतातील दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या. मुलींचे शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Bangladesh PM Khaleda Zia Dies at 80 After Prolonged Illness

Web Summary : Former Bangladesh Prime Minister Khaleda Zia passed away at 80 after battling a long illness. A key figure in Bangladeshi politics, she served three terms as Prime Minister. Her death marks the end of a significant era. She was suffering from liver cirrhosis, arthritis, diabetes and kidney related ailments.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश