केनियात अतिरेकी हल्ला, ४८ ठार
By Admin | Updated: June 17, 2014 00:18 IST2014-06-17T00:18:09+5:302014-06-17T00:18:09+5:30
सोमालियन दहशतवाद्यांनी केनियात किनारपट्टीवरील एका छोट्या शहरामध्ये केलेल्या हल्ल्यात ४८ जण मारले गेले.

केनियात अतिरेकी हल्ला, ४८ ठार
नैरोबी : सोमालियन दहशतवाद्यांनी केनियात किनारपट्टीवरील एका छोट्या शहरामध्ये केलेल्या हल्ल्यात ४८ जण मारले गेले.
स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज अतिरेकी काळ बनून आले होते. त्यांनी म्पेकेतोनी शहरातील पोलीस चौकी, बँक, सरकारी कार्यालये व दोन उपाहारगृहांवर हल्ला केला. एवढेच नाही तर त्यांनी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांवरही गोळीबार केला.
रविवारी रात्री हा हल्ला झाला. शहरवासीय टीव्हीवर विश्वकप फुटबॉल स्पर्धेतील रोमांचाचा आनंद लुटत असतानाच दहशतवादी शहरात घुसले. सुरक्षा कर्मचारी प्रतिकार करू न शकल्याने दहशतवाद्यांना मोकळे रान मिळाले. परिणामी सकाळपर्यंत त्यांचा धुडगूस सुरू होता.
प्रशासनाने या हल्ल्यासाठी अल-काईदाशी संलग्न अल-शबाब या सोमालियन दहशतवादी संघटनेला जबाबदार ठरविले आहे. केनियाचे पोलीस प्रमुख डेव्हिड किमाइयो यांनी मृतांची संख्या ४८ असल्याचे सांगितले. ब्रीज व्ह्यू हॉटेलमध्ये नागरिक फुटबॉल सामना पाहत होते. तेव्हाच दहशतवादी तेथे आले. त्यांनी पुरुषांना वेगळे केले आणि महिलांसमक्ष त्यांना गोळ््या घातल्या. (वृत्तसंस्था)