कझाकिस्तानवरून रशियाला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाला अक्ताऊ शहरातील विमानतळाजवळ बुधवारी अपघात झाला. यासंदर्भात कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने माहिती दिली होती. आता या अपघातासंदर्भता एक मोठा खुलासा झाला आहे.
कझाकस्तानातील मीडिया आउटलेट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पश्चिमी कझाकिस्तानमध्ये अपघातग्रस्त झालेल्या अझरबैजान एअरलाइन्सच्या प्रवासी विमानात ऑक्सीजन टँकचा स्फोट झाला होता. या विमानात 67 लोक होते. तसेच, विमान अपघात होण्यापूर्वी प्रवासी बेशुद्धदेखील होऊ लागले होते.
कॅस्पियन समुद्र किनाऱ्यावर झालो हातो अपघात -रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अझरबैजान एअरलाइन्स फ्लाइट जे 2-8243 नियोजित मार्गापासून शेकडो मैल दूर उडून कॅस्पियन समुद्राच्या किना ऱ्यावर क्रॅश झाले. यासंदर्भात रशियाच्या विमानचालन नियामकाने म्हटले होते की, हा अपघात एका पक्ष्याच्या धडकेमुळे झाला. कझाकस्तानमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्ताऊ शहराजवळ विमान त्याच्या नियोजित मार्गावरून भरकटले. या अपघातात 32 जण बचावले आहेत.
अपघाताचा व्हिडिओ -
38 जणांचा मृत्यू -अझरबैजान एअरलाइन्सने म्हटले आहे की, या विमानात एकूण 67 जण स्वार होते. यांत 62 प्रवासी तर पाच क्रू सदस्य होते. कझाकस्तान माध्यमांनी उपपंतप्रधानांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. कझाकिस्तान परिवहन मंत्रालयाने टेलीग्रामवरून सांगितले की, "बाकू-ग्रोझनी मार्गावर चालणारे एक विमान अकताऊ शहराजवळ क्रॅश झाले. हे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान आहे."