केटी पेरीनं इन्स्टाग्रामवर टाकला "काली" मातेचा फोटो, भारतीयांना राग अनावर

By Admin | Updated: April 20, 2017 13:59 IST2017-04-20T13:59:33+5:302017-04-20T13:59:33+5:30

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरीनं इन्स्टाग्राम एक फोटो शेअर करून वाद ओढावून घेतला आहे

Katie Perry puts "black" female photo on installagram, Indians get angry | केटी पेरीनं इन्स्टाग्रामवर टाकला "काली" मातेचा फोटो, भारतीयांना राग अनावर

केटी पेरीनं इन्स्टाग्रामवर टाकला "काली" मातेचा फोटो, भारतीयांना राग अनावर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - गेल्या दोन दिवसांपूर्वीच सोनू निगमचा अजानवरच्या ट्विटचा वाद कायम असतानाच आता आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरीनं इन्स्टाग्राम एक फोटो शेअर करून वाद ओढावून घेतला आहे. केटीनं बुधवारी इन्स्टाग्राम प्रोफाइलवर वाईट शक्तींची नायनाट करणारी काली मातेचा फोटो शेअर केला होता आणि फोटोच्या खाली करंट मूड (current mood) असं लिहिलेलं होतं.

भारतीय यूजर्सना केटी पेरीचं हे कृत्य अजिबात न रुचल्यानं त्यांनी केटी पेरीला इन्स्टाग्रामवरच खडे बोल सुनावले आहेत. या वादग्रस्त ट्विटमुळे केटी पेरीला अनेक भारतीय यूजर्सनी लक्ष्य केलं आहे. एका यूजर्सनं भारतीय देवतांचा अपमान करू नका, याला मूड म्हणता येणार नाही. काही तरी मूल्ये बाळगा आणि लवकरात लवकर हा फोटो तुमच्या प्रोफाइलवरून काढून टाका, असं म्हटलं आहे. तर दुस-या एका युजर्सनं टीकात्मक प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, कोणत्याही धार्मिक फोटोचा उपयोग स्वतःचा मूड दाखवण्यासाठी करणं योग्य नाही.

मात्र केटी पेरीच्या समर्थनार्थही काही लोक पुढे सरसावले आहेत. तसेच केटी पेरीला हे प्रकरण गांभीर्यानं न घेण्याचाही अनेक युझर्सनी सल्ला दिला आहे. केटी पेरीचे नाव हे भारतीयांसाठी काही नवीन नाही. 2010मध्ये केटी पेरीनं राजस्थानमध्ये रसेल ब्रांड याच्याशी हिंदू परंपरेनुसार लग्न केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर दोघांमध्ये घटस्फोटही झाला. जागतिक स्तरावर केटी पेरीला हॉट स्टार म्हणून ओळखलं जातं. केटी पेरीचा भारतातही लाखोंच्या संख्येत मोठा चाहतावर्ग आहे.

Web Title: Katie Perry puts "black" female photo on installagram, Indians get angry