शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 11:35 IST

तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला

जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. पाकचे लोक पोटापाण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांचे भारतविरोधाचे खूळ सुटत नाही, असा घणाघात भारताच्या मुत्सद्दी सीमा पूजानी यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी यूएनएचआरसीमध्ये भारतावर खोटे आरोप केले होते. त्याला पूजानी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकला दहशतवादी देश संबोधत तो भारताविरुद्ध अपप्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या. एवढेच नाही तर पूजानी यांनी तुर्कस्तान व इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरही खेद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे टाळा, असा सल्ला त्यांनी तुर्की आणि ओआयसीला दिला. जम्मू-काश्मीर व लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे व कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)

पाकने मानवाधिकारावर बोलणे हाच मोठा विनोदपाकिस्तानी मंत्र्यांच्या तोंडून मानवाधिकाराची चर्चा ऐकणे म्हणजे विनोद आहे. आवाज उठवणारे पाकिस्तानात गायब होतात. पाकिस्तानच्या स्वतःच्या चौकशी आयोगाकडे गेल्या दशकात बेपत्ता व्यक्तींच्या ८,४६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जे भारतातील अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी आधी स्वतःच्या अंगणात डोकावले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या पाकच्या मंत्रीगेल्या गुरुवारी पाकच्या मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताचे नाव न घेता पारंपरिक व अपारंपरिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर चिंता व्यक्त केली होती. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे त्या  म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर