काश्मीर नेहमीच केंद्रस्थानी -पाक
By Admin | Updated: October 2, 2015 23:50 IST2015-10-02T23:50:23+5:302015-10-02T23:50:23+5:30
चर्चा व दहशतवाद सोबत चालू शकत नसल्याचे भारताने स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा चर्चेच्या नेहमीच अग्रस्थानी राहील

काश्मीर नेहमीच केंद्रस्थानी -पाक
संयुक्त राष्ट्र : चर्चा व दहशतवाद सोबत चालू शकत नसल्याचे भारताने स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा चर्चेच्या नेहमीच अग्रस्थानी राहील, असे म्हणत पुन्हा दुगाण्या झाडल्या आहेत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या आमसभेतील भाषणानंतर पाकने भारत चर्चा टाळण्यासाठी दहशतवादाचा बागुलबुवा पुढे करत असल्याचे म्हटले.
स्वराज यांनी त्यांच्या भाषणात शरीफ यांनी भारतासोबत शांततेसाठी मांडलेल्या चतु:सूत्री प्रस्तावाचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, शरीफ यांनी चतु:सूत्रीऐवजी केवळ एकच मुद्दा (दहशतवाद सोडून देणे) सोडवावा. त्यानंतर सर्वकाही आपसूकच ठीक होईल. (वृत्तसंस्था)