प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात आता कपिल शर्माही

By Admin | Updated: March 19, 2016 10:41 IST2016-03-19T01:37:05+5:302016-03-19T10:41:25+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्मा यांनी येथील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ मेणाच्या पुतळा संग्रहालयात आपले स्थान निश्चित केले आहे.

Kapil Sharma also came to the famous Madam Tusson Museum | प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात आता कपिल शर्माही

प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात आता कपिल शर्माही

लंडन : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्मा यांनी येथील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ मेणाच्या पुतळा संग्रहालयात आपले स्थान निश्चित केले आहे.
दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या अत्यंत प्रेक्षकप्रिय मालिकेने कपिल शर्मा घरोघर पोहोचले आहेत. नुकतेच त्यांनी फोर्ब्ज इंडिया सेलेब्रिटी लिस्टमध्ये स्थान मिळविले असताना आपला मेणाचा पुतळा बनणार असल्याचे त्यांना समजले. मादाम तुसाँ पुतळा संग्रहालयात स्थान पटकावणारे कपिल शर्मा हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पहिले कलावंत ठरले आहेत. या संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पुतळा असणार आहे. संग्रहालयाच्या पुतळा तज्ज्ञांनी नुकताच मोदी यांचा आवश्यक तो तपशील घेतला. याच तुकडीने शर्मा यांचीही मोजमापे घेतली. शर्मा यांचा पुतळा बनायला सहा महिने लागतील, असे वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Kapil Sharma also came to the famous Madam Tusson Museum