शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

केवळ भारतचं नव्हे तर या देशातही 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 12:53 IST

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आजच्याच दिवशी फक्त भारतच नाही तर, जगातील आणखी तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं. 

भारताव्यतिरिक्त ज्या तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, बहरिन आणि कांगो या देशांचा समावेश आहे. खरं तर आपल्या देशाला ब्रिटीश 1947 रोजी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 1948 रोजी स्वतंत्र करणार होते. पण महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना सळो की पळो केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या ब्रिटिशांनी एक वर्षाआगोदर 15 ऑगस्ट 1947रोजीच स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. 

जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या कोरियाला 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. 1910 ते 1945 पर्यंत कोरिया जापानच्या गुलामगिरीत होता. आज आपण ज्या देशांना दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया म्हणून ओळखतो, ते आधी एकत्र होते. त्यानंतर 1948मध्ये त्यांना दोन देशांमध्ये वेगळं करण्यात आलं.

15 ऑगस्ट 1971पर्यंत मुळचा अरबांचा देश असलेला बहरिन ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. सध्याची बहरिनची राजधानी मनामा आहे. 

15 ऑगस्ट 1960रोजी कांगो फ्रांसपासून वेगळा झाला. कांगो जवळपास 80 वर्षांपर्यंत फ्रान्सच्या गुलामगिरीत होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील 11व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय